पुणे

हुतात्मा एक्सप्रेससह अनेक गाड्यांना उशिर

CD

हुतात्मा एक्स्प्रेससह अनेक गाड्यांना उशीर

दौंड-मनमाड दरम्यानच्या दुहेरीकरणामुळे प्रवाशांना दोन ते सहा तासांची प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर / कुर्डुवाडी, ता. १७ :   दौंड मनमाड मनमाड दरम्यान सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे पुणे-सोलापूर हुतात्मा, हरंगुळ-हडपसर या रेल्वे गाड्यांसह अनेक गाड्या दोन ते सहा तास उशिराने धावल्या. यामुळे प्रवाशांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला.
दौंड ते मनमाड दरम्यान निंबळक-अकोळनेर जवळ   दुहेरीकरणाचे काम चालू आहे. कुर्डुवाडीवरून धावणाऱ्या   अनेक गाड्या शेवटच्या स्थानकावर पोचल्यानंतर पुढे दौंड-मनमाड मार्गे प्रवास करतात. या ठिकाणी दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने या गाड्या उशिराने धावत आहेत. याचाच परिणाम म्हणून पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस साधारणपणे ३ तास   उशिराने धावली. हरंगुळ- हडपसर  ही गाडी कुर्डुवाडीमध्ये ५ वाजून २० मिनिटांनी येते. परंतु साधारणपणे ६ तास उशिराने धावत असल्याने कुर्डुवाडीमध्ये रात्री उशिरा येणार होती.   पनवेल नांदेड व दिल्ली बंगळूर  कर्नाटक एक्स्प्रेस या प्रत्येकी दोन तास उशिराने धावल्या. या उशिराने धावणाऱ्या गाड्यांमुळे अनेक प्रवाशांनी खासगी वाहनांनी प्रवास केला. यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागला.

..प्रतिक्रिया...
मी पनवेल नांदेड एक्स्प्रेसने नांदेडला जाणार होतो. परंतु गाडी उशिरा असल्याने मी आता बस किंवा खासगी गाडीने जात आहे.
- विकास चव्हाण, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT