Pune Zp Sakal
पुणे

पुणे जिल्ह्यातील सरपंचांना गाव कृती आराखड्याबाबत प्रशिक्षण

पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील गावांमधील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबाबत गावनिहाय कृती आराखडे तयार केले जाणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जिल्हा परिषदेच्यावतीने (ZP) जिल्ह्यातील गावांमधील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबाबत गावनिहाय कृती आराखडे (Action Plan) तयार केले जाणार आहेत. हे आराखडे कसे तयार करावेत. त्यात कोणत्या बाबींना प्राधान्य देण्यात यावे, आदींबाबत जिल्ह्यातील सरपंच, (Sarpanch) ग्रामसेवक (Gramsevak) आणि गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण (Online Training) देण्यास गुरुवारी (ता.२९) सुरवात करण्यात आली. (Training to Sarpanchs of Pune District on Village Action Plan)

या ऑनलाइन प्रशिक्षणाच्या आजच्या पहिल्या दिवशी आंबेगाव,जुन्नर, खेड, मावळ इंदापूर ,दौंड, भोर आणि वेल्हे या आठ तालुक्यातील सरपंचांना झूम ॲपच्या माध्यमातून हे ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. उद्या (ता. ३०) बारामती, हवेली, शिरूर, पुरंदर आणि मुळशी या पाच तालुक्यातील सरपंचांना हे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले.

जल जीवन मिशन अंतर्गत गाव कृती आराखडा तयार करण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना घरगुती नळ जोडणीद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे,. हा यामागचा जिल्हा परिषदेचा हेतू आहे. यानुसार येत्या १ ते ३ ऑगस्ट या कालावधीत गाव पातळीवरील गाव कृती आराखड्याच्या अनुषंगाने लागणारी माहिती कोबो टूल या संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून संकलित केली जाणार आहे. त्यानंतर जिल्हा स्तरावर सर्व गावांची या कृती आराखड्यांची माहिती संकलित करून जिल्हास्तरीय गाव कृती आराखडा तयार केला जाणार आहे. गाव पातळीवरील वैयक्तिक नळ जोडणीसाठी हा आराखडा तयार होणार आहे. त्यामुळे गाव पातळीवरील सर्वांनी यामध्ये सहभाग घेण्याचे आवाहन अध्यक्षा पानसरे यांनी केले आहे.

स्वातंत्र्यदिनी ग्रामसभांमध्ये मंजुरी

गाव पातळीवर तयार करण्यात येत असलेले हे गाव कृती आराखडे येत्या स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) आयोजित केल्या जाणाऱ्या ग्रामसभांमध्ये मंजुरीसाठी ठेवले जाणार आहेत. या आराखड्यांना ग्रामसभेने मंजुरी दिल्यानंतर, या आराखड्यात प्रस्तावित कामांना प्रत्यक्षात सुरवात केली जाणार असल्याचेही जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

पेट्रोल पंपावर मिळणार दारू! नव्या अबकारी धोरणाला मंजुरी, प्रशासन म्हणते, सहज खरेदी अन् पारदर्शकतेसाठी निर्णय

'10 वर्ष सिद्धार्थ माझ्याशी बोललाच नाही' अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सांगितलं भांडणाचं कारण, म्हणाली..'कोणाच्या जाण्याची वाट बघू नये...'

Ratnagiri ZP : सभापती निवडणुकीत धक्का तंत्राचा वापर; अनपेक्षित घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलली

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगर जिल्ह्यात सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

SCROLL FOR NEXT