police
police Sakal Media
पुणे

पुणे : सहकारनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह गुन्हे निरीक्षकाची बदली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गुन्हेगाराच्या खुनानंतर त्याच्या समर्थकांनी अंत्यविधीला काढलेल्या दुचाकी रॅलीवेळी केलेला निष्काळजीपणा सहकारनगर पोलिस ठाण्यातील दोन वरिष्ठ पोलिसांना भोवला आहे. त्यांची आर्थिक व सायबर गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यातील एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक व गुन्हे निरीक्षक आहे.(transfer of crime inspector along with senior inspector of police on sahakarnagar police station)

व्हिडिओ व्हायरवर दुचाकी रॅली काढल्याबाबतचा निष्काळजीपणा उघड झाला होता. या प्रकरणी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गांभिर्याने दखल घेतली आहे. गौतम गंभिरे आणि राजेंद्रकुमार कदम असे बदली करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. गंभिरे हे वरिष्ठ पोलिस निरीक्षक असून त्यांची आर्थिक व सायबर गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. तर कदम हे पोलिस निरीक्षक (गुन्हे) असू त्यांची सायबर गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. तर स्वाती देसाई यांची सहकारनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बिबवेवाडी परसिरातील सराईत माधव वाघाटेचा खून झाल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेला शेकडो समर्थकांनी दुचाकीची रॅली काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. याप्रकरणी १५० ते २०० जणांविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी १५ पथके स्थापन करून ९६ पेक्षा अधिक जणांना अटक करून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे.

संचारबंदीच्या कालावधीत अंत्ययात्रेला दुचाकी रॅली कशी काय काढण्यात आली, असा सवाल उपस्थित करीत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संबंधितांना फैलावर घेतले होते. त्याशिवाय शहरातील सर्व पोलिस उपायुक्तांची तातडीने बैठक घेतली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT