pune police transfer sakal
पुणे

पुणे शहरातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बदली

पुणे शहरातील विमानतळ, फरासखाना, चंदननगर, बिबवेवाडी या चार पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहरातील विमानतळ, फरासखाना, चंदननगर, बिबवेवाडी या चार पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे.

पुणे - शहरातील विमानतळ, फरासखाना, चंदननगर, बिबवेवाडी या चार पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. संबंधित पोलिस ठाण्यात नवीन पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार अतिरीक्त पोलिस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांची बदली गुन्हे शाखेमध्ये करण्यात आली आहे. त्यांच्या जागी फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खडकी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक संगीता जाधव यांची बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून नेमणुक करण्यात आली आहे. विशेष शाखेतील पोलिस निरीक्षक प्रकाश पासलकर यांची सहकारनगर पोलिस ठाणे येथे पोलिस निरीक्षक (गुन्हे), तर फरासखाना पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून शब्बीर सय्यद यांची नेमणूक झाली आहे. सय्यद यापुर्वी फरासखाना पोलिस ठाण्यातच गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT