transfer of vishwajeet kaingade and ravindra shelke lonand hadapsar Police Station Sakal
पुणे

Pune News : लोणीकंद, हडपसर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांची बदली

लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे आणि हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे आणि हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. लोणीकंद पोलिस ठाण्यांतर्गत वाघोली पोलिस चौकीत एका तरुणाने मंगळवारी स्वत: ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

तर हडपसर पोलिस ठाण्यात घरकाम करणाऱ्या एका महिलेला पोलिस कर्मचाऱ्यांकडून मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी बदलीचे आदेश काढले. वरिष्ठ निरीक्षक काईंगडे यांची शहर पोलिस दलातील विशेष शाखेत, तर शेळके यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.

अन्य सात पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

शहर पोलिस दलातील अन्य सात पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्यांचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी दिले आहेत. पोलिस निरीक्षकाचे नाव आणि कंसात बदलीचे ठिकाण-

प्रशांत भस्मे, पोलिस निरीक्षक गुन्हे बंडगार्डन (वरिष्ठ निरीक्षक फरासखाना पोलिस ठाणे), मनोज शेडगे, पोलिस निरीक्षक न्यायालय आवार (वरिष्ठ निरीक्षक वारजे), संतोष पांढरे, पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा (वरिष्ठ निरीक्षक हडपसर), कैलास करे, पोलिस निरीक्षक गुन्हे हडपसर (वरिष्ठ निरीक्षक लोणीकंद), मंगल मोढवे, नव्याने हजर (पोलिस निरीक्षक गुन्हे, भारती विद्यापीठ), पंडित रेजितवाड, नव्याने हजर (पोलिस निरीक्षक गुन्हे हडपसर), युवराज नांद्रे, नव्याने हजर (पोलिस निरीक्षक गुन्हे चतु:शृंगी).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protests : नेपाळ पेटले ! Zen-G आंदोलकांचा राष्ट्रपती निवासस्थानावर कब्जा, कायदा मंत्र्याचे घरही जाळले; राजकीय संकट गडद

Leopard Attack:'पारनेर तालुक्यात एकाच आठवड्यात बिबट्याच्या हाल्ल्यात दोघांचा मृत्यू'; तीन वर्षीय बालकावर हल्ला

Pitru Paksha 2025: पूर्वजांचा आशीर्वाद हवा आहे? मग पितृपक्षात नक्की करा हे ४ उपाय

Latest Marathi News Updates: डोंबिवलीतील पलावा परिसरात बिर्याणीच्या दुकानाला भीषण आग

Madhya Pradesh : इलेक्ट्रिक वाहन धोरण राबवणारे देशातील पहिले राज्य ठरले मध्य प्रदेश; CM मोहन यादव म्हणाले...

SCROLL FOR NEXT