transformer.jpg 
पुणे

पुण्यात मोठी दुर्घटना टळली; पावसाच्या तडाक्याने कोसळला ट्रान्सफाॅर्मर अन्...

निलेश बोरुडे

किरकटवाडी (पुणे) : कोल्हेवाडी, किरकटवाडी (ता. हवेली) येथील धन्वंतरी पार्क सोसायटी जवळील विजेचा ट्रान्सफाॅर्मर जोरदार वारा व पावसामुळे कोसळला. त्यामुळे कोल्हेवाडी व परिसरातील विजेचा प्रवाह खंडित झाला आहे. सुदैवाने येथील रस्त्यावर कोणी नसल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

आज येथील परिसरात अचानक पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. जोरदार पावसाबरोबर वारा आणि विजेचा कडकडाटही सुरू होता. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने कोल्हेवाडी येथील धन्वंतरी पार्क जवळील विजेचा ट्रान्सफाॅर्मर कोसळला. सुदैवाने विजेच्या तारा तुटल्या नाहीत.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 

ट्रान्सफाॅर्मर कोसळल्याची माहिती मिळताच महावितरणच्या वडगाव उपविभागातील कर्मचाऱ्यांनी तातडीने ट्रान्सफाॅर्मरची दुरुस्ती केली व कोसळलेले खांब उभे करण्याचे काम सुरू केले आहे. सदर ट्रान्सफॉर्मर वरील विजेचा प्रवाह काम होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार असून इतर परिसरातील वीज प्रवाह पूर्ववत करण्यात येणार असल्याचे महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता कल्याण गिरी व सहाय्यक अभियंता सचिन आंबवले यांच्याकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT