Hinjewadi 
पुणे

वाहतूक बदलामुळे पाऊण तासाची बचत

संदीप घिसे

पिंपरी - हिंजवडीमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी वाहतुकीमध्ये बदल केले. याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे. चार लाख आयटीयन्सचा सकाळ व सायंकाळच्या प्रवासातील पाऊण तास वाचत आहे.

हिंजवडीतील वाहतूक कोंडीमुळे आयटीयन्स हैराण झाले होते. यामुळे काही कंपन्या हिंजवडीतून स्थलांतर करणार असल्याची चर्चा सुरू होती. या चर्चेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी स्वतः पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन मैदानात उतरले. त्यांनी हिंजवडीतील वाहतूक समस्येची पाहणी केली. त्यानंतर हिंजवडीतील शिवाजी चौक, तसेच वाकडमधील भुजबळ चौक आणि भूमकर चौक येथील वाहतुकीमध्ये काही बदल सुचवले. त्यामुळे आता वाहतूक कोंडी कमी होताना दिसत आहे.

हिंजवडीमध्ये एकशे पस्तीस आयटी कंपन्या असून, त्यामध्ये जवळपास चार लाख संगणक अभियंते काम करीत आहेत. तसेच, इतर कामगारांची संख्या पाहता हा आकडा जवळपास दहा लाखांवर जातो. आयटीयन्सचा सुमारे एक तास वाहतूक कोंडीत जात होता.

वाहतुकीमध्ये केलेल्या बदलामुळे येताना आणि जाताना पाऊण तासांची बचत झाली आहे. काही ठिकाणी गतिरोधकाची आवश्‍यकता असून, त्यासाठी एमआयडीसी आणि वाहतूक पोलिसांकडे पाठपुरावा सुरू आहे, असे एचआयएचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर चरणजितसिंग भोगल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Drought Tweet : यंदा पावसाने दगा दिला; एकनाथ शिंदे यांचे ट्वीट चर्चेत, नेमकं काय म्हणाले शिंदे

रस्त्याने चालताना अघटित घडलं! बंद गोदामाच्या बाल्कनीचा भाग थेट पादचाऱ्यावर कोसळला, साकीनाक्यातील थरारक घटना CCTVत कैद

Ratnagiri Water Shortage: रत्नागिरी शहरात पाणी कपातीच्या हालचाली; नगरपालिका सभेत दुष्काळसदृश स्थितीमुळे टंचाईवर चर्चा

Latest Marathi News Live Update: धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल

Sunil Tatkare: खासदार सुनील तटकरेंच्या आक्रमक भूमिकेचा दणका; काही तासांत सूत्रे फिरली; खेडमधील २.५ कोटींच्या कामांना वर्कऑर्डर

SCROLL FOR NEXT