23Pune-RTO-l.jpg
23Pune-RTO-l.jpg 
पुणे

परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला दिली भेट

सकाळवृत्तसेवा

पुणे : परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी शनिवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. "उपलब्ध कर्मचारी संख्येत जास्तीत जास्त काम करा. नागरिकांची कामे कमी वेळेत कशी होतील यावर लक्ष केंद्रित करा,' अशा सूचनाही त्यांनी या वेळी कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी त्यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणीही समजून घेतल्या. 
आरटीओ कार्यालयातील आज सकाळीच चन्ने भेटीसाठी आले. त्यांनी प्रत्येक विभागाला भेट देऊन पाहणी केली.
 

शिकाऊ परवाना, खटला विभाग, नोंदणी विभाग, परवाना विभाग, क्रमांक वितरण विभागाचे कामकाजाची पाहणी केली. प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, पिंपरी चिंचवड आरटीओचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांच्यासह बारामती, अकलूज कार्यालयाचे अधिकारी, तसेच आयडीटीआर संस्थेचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. परिवहन आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर चन्ने यांनी पहिल्यांदाच पुणे आरटीओला भेट दिली. यापूर्वी पिंपरी - चिंचवड आरटीओ कार्यालय आणि आयडीटीआर संस्थेला भट देवून त्यांनी पाहणी केली होती. 

पत्रकारांशी बोलताना चन्ने म्हणाले .''कोणत्याही विशेष गोष्टीसाठी हा पाहणी दौरा नव्हता. कामकाजाचा भाग म्हणून हा दौरा आयोजित करण्यात आला होता. पुणे आरटीओ कार्यालयाचा कार्यभार मोठा आहे. त्यातुलनेत त्यांच्याकडे असणारी कर्मचारी संख्या कमी आहे. कमी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनही पुणे आरटीओ कार्यालय नागरिकांना चांगली सेवा देत आहे, तसेच कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्याबाबत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.'' 

आरटीओचे काम समाधानकारक 
पुणे आरटीओ कार्यालयाचे कार्यक्षेत्र मोठे आहे. मात्र, त्या तुलनेत कर्मचारी संख्या कमी आहे. त्यातच काही महिन्यांपूर्वी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार काही अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याने कर्मचारी संख्या आणखीनच कमी झाली आहे, असे सांगून चन्ने म्हणाले, "न्यायालयीन प्रक्रियेमुळे मोटार निरीक्षकांची भरती प्रक्रिया रखडली आहे. याबाबत काही उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे मोटार निरीक्षकांची भरती होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच आरटीओला कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवणार नाही.' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT