पुणे

नाशिकफाट्यावर ट्रान्स्पोर्ट हब 

ज्ञानेश्वर बिजले

पिंपरी- शहरातील मेट्रो मार्गातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा नाशिकफाटा येथील दुहेरी उड्डाण पुलाजवळ असून तेथील काम महामेट्रोने हाती घेतले आहे. येथील मेट्रोस्थानक तीन मजली होणार असून पहिल्या मजल्यावर व्यापारी संकुल असेल. लोकल रेल्वे, बीआरटी, मेट्रो आणि नाशिक रस्त्याकडे जाणारे प्रवासी यामुळे या चौकातील मेट्रोस्थानक हे शहरातील "ट्रान्स्पोर्ट हब' होणार आहे. 

शहराच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातही या "ट्रान्स्पोर्ट हब'चा समावेश असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. नाशिकफाटा ते वाकड या मार्गावरील बीआरटी बससेवेमुळे प्रवाशांना येथून हिंजवडी आयटी पार्ककडे जाण्याची सोय झाली आहे. नाशिक रस्त्याचे रुंदीकरण करताना त्या मार्गावरही बीआरटी व मेट्रोचे नियोजन करण्याचे ठरले आहे. त्याचा सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येथील मेट्रोस्थानकावरून प्रवाशांना थेट कासारवाडी रेल्वेस्थानकावर येजा करता येईल. त्यामुळे अन्य भागांतून रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना येथून मेट्रोचा वापर करणे सोयीचे ठरणार आहे. येथून चारही दिशेला प्रवाशांना वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करता येणार असल्यामुळे हे स्थानक महत्त्वाचे असेल. 

शहरातील एकमेव दुहेरी उड्डाण पूल या चौकात असल्यामुळे मुख्य रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकावरून मार्गस्थ होत असलेल्या मेट्रोला येथे वळण घ्यावे लागणार आहे. तसेच, चौकातील पहिल्या पुलावरून जावे लागणार असल्यामुळे मेट्रोच्या खांबांची उंचीही जास्त ठेवण्यात येणार आहे. तेथे खांबाची उंची सुमारे वीस मीटर असेल. पुण्याकडून पिंपरीकडे जाणाऱ्या पुलाजवळून बीआरटी मार्गातून मेट्रोचे खांब उभे करण्यात येणार आहेत. पुलाचा धोका उद्‌भवू नये, या उद्देशाने गेले चार महिने तेथे मायक्रोपायलींग करून आधार देण्यात आला. त्यानंतर तेथे खांबांसाठी पाया घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला कासारवाडी रेल्वे स्थानकासमोर मुख्य रस्ता व सेवारस्ता यांच्यामधील दुभाजकावर व्हायाडक्‍ट व स्थानकासाठी खांब उभारण्यात येत आहेत. तेथे जमिनीखाली मातीचे प्रमाण जास्त असल्यामुळे महामेट्रोने पायलिंगच्या साह्याने पाया घेतला आहे. 

नाशिकफाटा येथील वाहतूक लक्षात घेता तेथील मेट्रोचे काम महत्त्वाचे ठरणार आहे. तेथे 32 खांब उभारण्यात येत आहेत. स्थानकाच्या एका खांबांच्या पायासाठी तेथे 60 टन लोखंड व 180 टन कॉंक्रीट वापरले. अन्य खांबांच्या तुलनेत ते दुप्पट आहे. चौकातील खांबाचा पाया हायड्रोलिक पायलिंग रिगच्या साह्याने घेण्याचे काम गेल्या आठवड्यात सुरू केले. नाशिकफाटा पुलावरील बीआरटी प्रवाशांसाठी मेट्रो स्थानकापासून स्काय वॉक पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. 
- गौतम बिऱ्हाडे, मुख्य प्रकल्प अधिकारी, महामेट्रो 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर पदवीधर निवडणूक; दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारींची मुसंडी; महायुतीच्या कोहळेंचे मताधिक्य केले सर; निकालाकडे राज्याचं सर्वांचे लक्ष

Mumbai Night Cab Viral Video : "आज मला पुरुष असल्यासारखं वाटलं!"; पहाटे २ वाजता मुंबईत उतरलेल्या तरुणीने 'त्या' कॅबमधून प्रवास केला अन्... व्हिडिओ तुफान व्हायरल!

Mumbai News : वाराणशीतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात; काशी महाराष्ट्र सेवा समितीचा पुढाकार

WPL 2027 Auction : सोफी मॉलिनेक्स ठरली महागडी खेळाडू... मुंबई इंडियन्स, RCB चे तगडे संघ तयार; जाणून घ्या सर्व संघांची लिस्ट...

Marathi News Live Updates : वाचा दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT