varandh ghat 
पुणे

वरंध घाटातून वाहतूक दोन महिन्यांसाठी बंद 

विजय जाधव

भोर (पुणे) : भोर- महाड मार्गावरील वरंधा घाटातील खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे वरंधा घाटातून वाहतूक पुढील दोन महिने बंद राहणार आहे. 

वरंधा घाटातील रस्ता 4 ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी खचला आणि काही ठिकाणी दरडी पडल्या. घाटातील भोर तालुक्‍याच्या बाजूला असलेल्या रस्त्याचे काम पुढील पंधरा दिवसात पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. परंतु, महाडच्या बाजूकडील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम फार मोठे आहे. त्या कामास दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे, अशी माहिती महाडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बप्पा बहिर यांनी दिली. 

वरंधा घाटातील घाटमाथ्याजवळील मोठ्या वळणावरील रस्ता खचल्याने आणि काही ठिकाणी मोठ्या दरडी पडल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला आहे. त्यामुळे आम्ही हा रस्ता चार ऑगस्टपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. या मार्गावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हे सुमारे दोन महिने सुरू राहणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतरच या मार्गाने वाहतूक सुरळीत होईल, असेही बहिर यांनी स्पष्ट केले. 

भोरकडून घाटातील वाघजाई मंदिरापर्यंतचा रस्ता हा पुढील पंधरा दिवसानंतर सुरू सुरू होणार आहे. त्यामुळे केवळ घाटातील वाघजाई मंदिरापर्यंतच वाहने जाऊ शकतील. श्री. ठाणगे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग भोर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT