पुणे

वृक्ष गणना संवर्धनासाठी की ठेकेदारासाठी?

CD

पिंपरी, ता. १ : शहरातील झाडांची यापूर्वी केलेली जीआयएस आधारित गणना अद्याप अपूर्ण आहे. झाडांची छायाचित्रे, ठिकाण, स्थिती आणि क्रमांक नागरिकांसाठी ऑनलाइन उपलब्ध झालेले नाहीत. संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावूनही कारवाई झालेली नाही, असे असतानाच महापालिकेच्या उद्यान विभागाने पुन्हा वृक्षगणनेसाठी सुमारे नऊ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. त्यामुळे ही गणना वृक्षसंवर्धनासाठी की ठेकेदारासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरातील झाडांची जीआयएस अथवा जीपीएस पद्धतीने मोजणी व मॅपिंग करण्यासाठी इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. मात्र, यापूर्वीच्या गणनेला स्थायी समितीने २७ सप्टेंबर २०१७ रोजी मान्यता दिली होती. त्यावर सहा कोटी रुपयांहून अधिक खर्च झाल्याचे सांगण्यात येते. या गणनेत शहरात ३२ लाख १६ हजार ७९९ झाडे असल्याचा दावा करण्यात आला होता.

झाडांचे छायाचित्र, प्रजाती, उंची, रुंदी, खोडाचा घेर, ठिकाण, स्थिती आणि क्रमांक अशी माहिती संकलित केली जाणार होती. त्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करून माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचेही नियोजन होते. या माहितीच्या आधारे वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्याचा दावा प्रशासनाने केला होता. प्रत्यक्षात मात्र केवळ झाडांची संख्या जाहीर झाली. ॲप आणि ऑनलाइन माहिती उपलब्ध झाली नाही. त्यामुळे वृक्ष जतन आणि संवर्धनासाठी या खर्चाचा नेमका काय उपयोग झाला, हा प्रश्न कायम आहे.

याआधी दोनदा झाली होती वृक्षगणना..
यापूर्वी २००३-०४ मध्ये मानवी पद्धतीने वृक्षगणना झाली होती. त्यावेळी एका झाडाच्या मोजणीसाठी दोन रुपये ३५ पैसे, तर एकूण ३९ लाख रुपये खर्च झाला होता. २०१७ नंतरच्या गणनेत एका झाडामागे दहा रुपये दर निश्चित करण्यात आला होता. जुन्या कामाचा हिशेब आणि अपूर्ण बाबींवर निर्णय होण्यापूर्वीच नवीन निविदा काढल्याने उद्यान विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दर पाच वर्षांनी वृक्षगणना करण्याची नियमात तरतूद आहे. त्यानुसार निविदा प्रसिद्ध केली आहे. सर्वेक्षणामुळे झाडांची सविस्तर माहिती उपलब्ध होईल. मागील निविदेतील अपूर्ण कामाबाबत वृक्ष प्राधिकरण समितीत निर्णय घेतला जाईल.
- महेश गारगोटे, मुख्य उद्यान अधीक्षक, महापालिका

क्षेत्रीय कार्यालयनिहाय वृक्षसंख्या
कार्यालय ः वृक्षसंख्या
अ ः ३,०६,०९४
ब ः ४,६२,१३७
क ः ३,५१,१७३
ड ः ५,१२,३६८
इ ः ८,४३,८२४
फ ः ७,४१,२०३
एकूण ः ३२,१६,७९९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet Decisions : मंत्रिमंडळ बैठकीवर तुकाराम मुंढेंचा प्रभाव चार महत्त्वाचे निर्णय; एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती

नाद खुळा...! वैभव सूर्यवंशीचा झंझावात अविश्वसनीय Catch ने रोखला, RCB च्या कर्णधाराचा Video तुफान व्हायरल झाला

Trump-Afghanistan: तालिबानची ट्रम्प यांना 1,000,000,000,000 डॉलरची ऑफर! बदल्यात ठेवली 'ही' मोठी अट

Kanakagiri Sambhaji Maharaj Memorial : कणकगिरीत थोरले संभाजी महाराजांच्या समाधीवर उभारली ४०० किलोची मेघडंबरी; पुण्यातील शिवप्रेमींचा ‘गनिमी काव्या’ने यशस्वी उपक्रम

Marathi News Live Updates : दिल्लीसह देशातील विद्यार्थी आंदोलनांशी संबंधित सर्व एफआयआर रद्द- सुप्रीम कोर्टाचे निर्देश

SCROLL FOR NEXT