Tree Sakal
पुणे

Electricity Shock : विजेच्या धक्क्याने झाड तोड कामगाराचा जागीच मृत्यू

माणिक बाग येथील एका मोठ्या गृहप्रकल्पात झाडांची छाटणी करत असताना कामगाराचा विजेच्या तारेस स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

माणिक बाग येथील एका मोठ्या गृहप्रकल्पात झाडांची छाटणी करत असताना कामगाराचा विजेच्या तारेस स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

सिंहगड रस्ता - माणिक बाग येथील एका मोठ्या गृहप्रकल्पात झाडांची छाटणी करत असताना कामगाराचा विजेच्या तारेस स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिंहगड रस्ता परिसरातील माणिक बाग येथील कुदळे पाटील टाऊनशिप येथे झाडे तोडण्याचे काम सुरू होते. यावेळी झाडे तोडणाऱ्या कामगाराचा संपर्क जवळच असलेल्या विद्युत वाहिनीशी आल्याने विजेचा धक्का बसून कामगाराचा जागीच मृत्यू झाला.

अशोक मारुती सोन्नर (वय ३८, रा. शिवनेरी नगर, कोंढवा पुणे ) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. घटनास्थळी माहिती मिळताच आनंदनगर येथील अग्निशमन दल तसेच सिंहगड पोलीस उपस्थित झाले. त्या ठिकाणी उच्च दाब विद्युत वाहिनी असल्याने कामगाराचा संपर्क येतातच त्याच्या कपड्याने पेट घेतला आणि त्यातच त्या कामगाराचा अंत झाला. आनंद नगर अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख प्रभाकर उमराटकर, केंद्र अधिकारी प्रकाश गोरे, तांडेल संतोष भिलारे, अग्निशमन जवान राकेश बरे, आदिनाथ पवार उपस्थित होते.

पुढील अधिक तपास सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अक्षय पाटील करत आहेत.

ही घटना घडली त्या ठिकाणी विद्युत वाहिन्या दोन इमारतींच्या मधून जाणार्‍या होत्या. या भूमिगत का नव्हत्या?  

विदुयत वाहिनी ज्या भागातून जात आहेत त्या ठिकाणी सुरक्षित यंत्रणा का नाही?

विदूत वाहिनीच्या जवळ पर्यन्त तिथे पत्र्याचे बांधकाम कसे करण्यात आले?

तसेच कामगारांसाठी झाडे तोडतांना सुरक्षा यंत्रणा नव्हती का?

ही प्रश्ने अनुत्तरित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणावर ठाम; १८ सप्टेंबरसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT