येरवडा - वाडिया बंगला परिसरातील खराडी ते शिवणे रस्त्यासाठी पावणेदोनशे वृक्ष काढण्यात येणार आहेत. 
पुणे

येरवड्यात वृक्षांवर कुऱ्हाड

सकाळवृत्तसेवा

येरवडा - वाडिया बंगला येथील खराडी ते शिवणे या शंभर मीटर रस्त्याच्या दरम्यान येणारे पावणेदोनशे वृक्ष काढणार आहेत. त्यामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण होणार आहे. नगर रस्ता चार पदरी असताना पुन्हा नव्याने रस्त्याची काय गरज आहे, असा प्रश्‍न पर्यावरण संघटनांनी केला आहे.

येरवड्यातील मुळा -मुठा नदी पात्राशेजारी वाडिया स्टड फार्मची जागा आहे. यातील काही जागा खराडी ते शिवणे रस्ता तयार करण्यासाठी महापालिकेला हस्तांतर करण्यात आली आहे. मात्र, या जागेत मोठ्या प्रमाणात वृक्ष आणि जैवविविधता आहे. उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीने याबाबत अहवाल तयार केला आहे.

तो पाहिल्यानंतर महापालिका आयुक्तांनी वृक्ष काढणे व पुनर्रोपण करण्यासाठी मान्यता दिली आहे. यामध्ये १६७ वृक्षांचा समावेश आहे. त्यामध्ये सुबाभूळ, बाभूळ, बोर, चंदन, करंज असे एकूण वीस प्रकारच्या वृक्षांचा समावेश आहे. यापैकी ४४ झाडे पूर्णपणे काढली जाणार आहेत, तर १२३ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. वृक्षांवर तशा प्रकारची नोटीस लावण्यात आली आहे. मात्र, याला पर्यावरण संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. रस्ता रुंदीकरणात केवळ वृक्षांची कत्तल होणार नसून, येथील जैवविविधता नष्ट होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

नदीकिनारी रस्ता तयार करताना पुराचा विचार केला गेला नाही. काही ठिकाणी ग्रीनझोन बदल करण्यात आले आहेत. येथील वृक्षांवर अवलंबून असलेल्या पक्षी, किडे, फुलपाखरांचा विचार कोण करणार? 
- पौर्णिमा जोशी, फ्रेंड्‌स ऑफ डॉ. सालिम अली बायोडायव्हर्सिटी पार्क

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha: समृद्धीवर ट्रॅव्हल्स ट्रकवर मागून धडकली; मेहकरजवळील घटना; १५ जण गंभीर तर १२ जण किरकोळ जखमी

Karad Highway: कऱ्हाडमध्ये पहिल्याच पावसात महामार्गाची पोलखोल; गटार तुंबले, पाणी-चिखल रस्त्यावर, गटारावरील तुटलेली झाकणेही जीवघेणी

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना धक्का! सलग 10 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या भावात मोठी वाढ; 10 ग्रॅमचा नवा दर किती?

Pune News: महसूल विभागालाच चकवा! बनावट शासकीय आदेशांचे रॅकेट उघड; भूमाफियांमध्ये खळबळ, महसूल अभिलेखांत फेरफार

Latest Marathi News Update : रमेश केरे पाटील यांचे विखे पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT