road side tree cutting
road side tree cutting 
पुणे

होर्डिंगसाठी वृक्षांची कत्तल, पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडीतील प्रकार 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : होर्डिंग (जाहिरात फलक) व दुकानांचे फलक दिसावेत यासाठी शहरातील रस्त्यांच्या कडेला लावलेल्या झाडांची सर्रासपणे कत्तल केली जात आहे. यामुळे पर्यावरणाला हानी पोचत असून, शहर सौंदर्याचे विद्रूपीकरण सुरू आहे. याकडे महापालिका आयुक्त, पर्यावरण, उद्यान, आकाशचिन्ह परवाना विभागांसह शहर सुधारणा व पर्यावरण संवर्धन समित्यांचे दुर्लक्ष झाले आहे. 

महापालिकेच्या उद्यान व पर्यावरण विभागांनी रस्त्यांच्या कडेला व दुभाजकांवर वृक्षारोपण केले आहे. अनेक झाडे रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरल्याने पुनर्रोपण केलेली आहेत. मात्र, दुकानांचे जाहिरात फलक व उंच लोखंडी सांगड्यांवर लावलेले होर्डिंग दिसण्यासाठी काहीजण त्यांची सर्रासपणे कत्तल सुरू आहे. यामुळे काही झाडे जळाली आहेत. काहींच्या फांद्या छाटल्या आहेत. याबाबत "आंघोळीची गोळी' संस्थेने झाडांचे सर्वेक्षण करून महापालिका प्रशासन व सरकारकडे तक्रार केली आहे. मात्र, त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. नाशिक फाटा ते हिंजवडीदरम्यान पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी, वाकड, हिंजवडीत झाडे तोडलेली आढळली. 

ठिकाणे 1121; होर्डिंग 1769 
महापालिकेच्या आकाश चिन्ह परवाना विभागाने होर्डिंग उभारणीसाठी शहरात एक हजार 121 ठिकाणे निश्‍चित केली आहेत. वेगवेगळ्या आकारातील एक हजार 769 होर्डिंग लावले आहेत. त्यांची सर्वाधिक लांबी 60 फूट आणि सर्वाधिक उंची 20 फूट आहे. यामुळे सहा बाय सहा फुटांपासून 60 बाय 20 फुटांपर्यंतचे होर्डिंग शहरात आढळतात. त्यासाठी लोखंडी सांगाडे उभारले आहेत. त्यात अनधिकृतपणे उभारलेले, सण, उत्सव, वाढदिवस, श्रद्धांजली, शुभेच्छांचे फलकांची भर पडते. 

होर्डिंगसाठी वृक्षतोड केल्याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पर्यावरण, उद्यान व आकाशचिन्ह परवाना विभाग, सारथी हेल्पलाइन, मुख्यमंत्री व पंतप्रधान कार्यालयाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. तरीही कारवाई होत नसून वृक्षतोड सुरूच आहे. 
- विनय पटेकर, आयटी अभियंता, स्वयंसेवक-आंघोळीची गोळी संस्था 

वृक्षांच्या परिसरात होर्डिंगला परवानगी नसावी. त्यासाठी झाडे तोडू नयेत. त्याला आळा घालण्यासाठी सीसी टीव्हीकॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवावे. वृक्षसंवर्धनासाठी स्वतंत्र अधिकारी असावा. दोषींवर दंडात्मक कारवाई करावी. तक्रारींसाठी संपर्क क्रमांक जाहीर करावा. 
- माधव पाटील, उद्योजक, स्वयंसेवक-आंघोळीची गोळी संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT