Tent 
पुणे

तरुणाईचा निसर्गाच्या सहवासात राहून निसर्गाशी एकरूप होणारा पर्यटनाचा ट्रेंड

नीलेश शेंडे

पुणे - एखाद्या धरणाच्या- तलावाच्या कडेला किंवा जंगलातील मोकळ्या माळावर तंबू ठोकायचा... शेजारी शेकोटी पेटवायची... वाऱ्याच्या गार झुळका अंगावर घेत मस्त गप्पांचा फड जमवायचा... आकाशातील चांदण्या मोजत रात्र जागवायची... भल्या सकाळी पक्षांच्या किलबिलाटाने उठायचे आणि डोंगराच्या सुळक्यावर जाणारी एखादी पायवाट तुडवायची... निसर्गाच्या सहवासात राहून निसर्गाशी एकरूप होणारा पर्यटनाचा हा ट्रेंड जिल्ह्याच्या पश्चिम भागात रुजताना दिसत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गडकोटांच्या भटकंतीमधून तरुणाईची निसर्गाशी आणि ऐतिहासिक स्थळांशी नाळ जोडली आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागातील डोंगररांगा, धरणे, लेण्यांकडे तरुणाई आकषत होत आहे. त्यातून अनेक भटके पाठीला सॅक लटकावून रानवाटा तुटवडतात. दुर्मिळ वनस्पती, वेली, फुले, प्राणी, पक्षी यांचा अभ्यास करण्यासाठी जंगलात भटकतात. 

या भटक्यांच्या निसर्गवेडाने मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हे, पुरंदर या भागात लेक कॅंपिंग, टेंट कॅंपिंग वाढत आहे. त्यामधून स्थानिकांना रोजगार मिळत आहे. तसेच, आडवाटेवरील ट्रेकसाठी वाटाड्यांची मागणी वाढली आहे. रानातली पाना-फुलांची व प्राणी-पक्षांची सखोल माहिती असणाऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे. चुलीवरील गावरान पद्धतीच्या जेवणाची लज्जत चाखण्यासाठीही खवय्ये गावांची वाट पकडत आहेत. पर्यटनाच्या या नव्या बदलामधून रोजगार आणि निसर्ग यांची चांगली सांगड घातली जात आहे. 

कॅंपिंगमध्ये मिळणाऱ्या सुविधा

  • चुलीवरील गावरान पद्धतीचे जेवण
  • तंबूमध्ये राहण्याची सोय
  • जंगल भ्रमंतीत रानमेव्याचा आस्वाद

या सुविधा मिळाव्यात

  • स्थानिकांनी पर्यटकांसोबत जंगलात काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन.
  • प्राणी, पक्षी, झाडे, फुले, गवत यांची शास्त्रीय व सखोल माहिती देणाऱ्यांना प्रशिक्षण.
  • जंगलभ्रमंतीसाठी वाटा निश्चित करून द्याव्यात.
  • पर्यटकांसाठी जागोजागी पॅगोडे, पायऱ्या, पिण्यासाठी पाण्याची सोय.
  • रॉक क्लायबिंग, व्हॅली क्रॉसिंग अशा प्रकारच्या साहसी खेळांची सोय.
  • स्थानिक तरुणांचे गट तयार करून त्यांना पर्यटनातून रोजगार संधी.

पर्यटकांनी काय करावे?

  • पर्यटकांनी निसर्गाचा मैत्रीपूर्ण आस्वाद घ्यावा.
  • वाटाड्यांनी सांगितलेल्या रस्त्याचा वापर करावा.
  • जंगलात प्राणी-पक्षी आणि स्थानिकांना त्रास होईल, असे वर्तन करू नये.

या ठिकाणांना पसंती
१) मावळ तालुक्यातील पवना धरण परिसर
२) मुळशी, खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर, डिंभे, कासारसाई व चासकमान धरण परिसर
३) ताम्हिणी व भीमाशंकर अभयारण्य परिसर 
४) अंधारबन, सावळ्या घाट, नाणेघाट, देवकुंड, जुन्नर परिसर

पर्यटकांचा तंबूमध्ये राहण्याकडे कल दिसत आहे. पूर्वी सकाळी फिरायला जायचे आणि संध्याकाळी परत घरी जायचे, अशी पुणेकर पर्यटकांची पद्धत होती. परंतु, आता पर्यटक रात्री निसर्गात मुक्काम करायला पसंती देत आहेत. डोंगरदऱ्यात भटकून निसर्ग समजून घेत आहे. शासनाने आमच्यासारख्या तरुणांना या नव्या बदलासाठी मार्गदर्शन करावे व पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्यात.
 - दीपक मरगळे व देविदास झोरे, मुळशीतील तरुण 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT