महापालिकेच्या सॅनिटरी नॅपकिन प्रकल्पासाठी ट्रायल लवकरच  Saka;l
पुणे

Pune News : महापालिकेच्या सॅनिटरी नॅपकिन प्रकल्पासाठी ट्रायल लवकरच

वापरलेल्या सॅनिटरी पॅडवर शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने सीएसआरच्या माध्यमातून प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी प्रक्रिया सुरु केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : वापरलेल्या सॅनिटरी पॅडवर शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने सीएसआरच्या माध्यमातून प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी प्रयोगशाळेकडून सॅनिटरी पॅडच्या नमुन्यांची अहवाल आल्यानंतर प्रकल्पातील यंत्र सामुग्रीची ट्रायल घेतली जाणार आहे.

त्यामुळे हा प्रकल्प लवकरच सुरु होण्याची शक्यता प्रशासनातर्फे वर्तविण्यात आली आहे. पुण्यात रोज सुमारे २२०० टन कचरा निर्मिती होते. त्यातील ओला व सुका कचरा वेगळा करून त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते. काही ओला कचरा थेट शेतकऱ्यांना खतनिर्मितीसाठी दिला जातो.

या कचऱ्यात सॅनिटरी पॅडचाही समावेश असला तरी त्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प नाही. महापालिकेने क्षेत्रीय कार्यालय स्तरावर सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी काही छोटे प्रकल्प सुरु केले होते. पण ते कालांतराने बंद पडले आहेत. त्यामुळे कचरा वेचकांसह प्रकल्पांवर काम करणाऱ्या कामगारांसाठी धोकादायक आहे.

महापालिकेने एका खासगी कंपनीच्या सहकार्याने सीएसआरमधून रामटेकडी येथे दैनंदिन ४.५ टन सॅनिटरी पॅडवर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारणीची प्रक्रिया गेल्या दोन वर्षापासून सुरु केली आहे. या प्रकल्पासाठी लागणारे तंत्रज्ञान परदेशातून आलेले आहे. पहिल्या टप्प्यात तीन वर्ष ही कंपनी हा प्रकल्प चालविणार आहे.

ही यंत्रसामग्री सुरु अद्ययावत व स्वयंचलित आहे, त्यामुळे सॅनिटरी पॅडवर प्रक्रिया करण्यासाठी मशिन काय क्षमतेने चालली पाहिजे यासाठी सेटिंग्ज केल्या जाणार आहेत. सॅनिटरी पॅडचे नमुने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर त्या अहवालानुसार यंत्रसामग्रीचे सेटिंग करून ट्रायल घेतली जाणार आहे.

‘‘सॅनिटरी पॅडवर प्रक्रिया करण्यासाठी ४.५ टन क्षमतेचा प्रकल्प रामटेकडी येथे सुरु केला जाणार आहे. सॅनिटरी पॅडचे नमुने प्रयोग शाळेत तपासणी करण्यासाठी पाठवले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर मशिनचे ट्रायल पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.’’

- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यास तयार, पण...''; ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा निर्णय

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Army Success Story: कष्टाच्या जाेरावर भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी अभिषेक बिडकर; १३ लाख विद्यार्थ्यांमधून यशाला गवसणी, आई-वडिलांच्या डाेळ्यात पाणी!

Maharashtra Kesari: मानाच्या गदेसाठी हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड लढणार; जय पाटील, सिकंदर शेख पराभूत

Baramati News: कृषी फीडरवरील वीजपुरवठा सलग पाच दिवस खंडित; ग्रामीण भागात संताप

SCROLL FOR NEXT