आदिवासींच्या मागण्या
सोडविण्याचे आश्वासन
जळगाव, ता.१७ : वनपट्टेधारकांच्या प्रलंबित मागण्या जिल्हा प्रशाासन स्तरावर सोडविण्याचे तर राज्य स्तरावरील मागण्या कबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत सोडविण्याचे आश्वासन अन्न व औषध प्रशाासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिल्याने गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची आज सांगता करण्यात आली. अशी माहिती लोकसंघर्ष मोर्चाच्या संस्थापक अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी दिली.
आज लोकसंघर्ष मोर्चाच्या संस्थापक अध्यक्षा शिंदे व पदाधिकाऱ्यांसोबत शनिवारी सायंकाळी मंत्री झिरवाळ, आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे संबंधित विभागाचे अधिकारी यांची बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला. अध्यक्षा शिंदे यांनी सांगितले की, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हयात नेमके किती वनदावे आहेत. किती पूर्णता, किती अंशत: मंजूर आहेत याची माहिती मिळावी, वन दाव्याचा प्रश्न सोडविण्यााठी एक कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात यावा, आणी तो राज्यभर राबवावा असा निर्णय घेण्यात आला आहे. पाच महत्वाचे मुद्दे आमचे होते. त्यासाठी कबिनेट मध्ये जावूनच ते मांडता येवून न्याय मिळवता येइल. ते मुद्दे कबिनेटमध्ये मांडण्याचे आश्वासन झिरवाळ यांनी दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.