पुणे

विद्यार्थी योजनांमध्ये समानता आणण्याचा निर्णय

CD

पुणे, ता. १४ : आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये समानता आणण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तालयाचे सहआयुक्त संतोष ठुबे यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश या समितीला दिले आहेत.
या दोन्ही विभागांकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणारे आर्थिक साहाय्य, अनुदानाची रक्कम, तसेच उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांचा समितीमार्फत तुलनात्मक अभ्यास करण्यात येणार आहे. शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ऑगस्ट महिन्यात बैठक झाली होती. या बैठकीत आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यामध्ये समानता आणण्यासाठी समिती स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते. त्यानुसार शासनाने ही समिती गठित करण्यास मंजुरी दिली आहे.
सहआयुक्त ठुबे समितीचे अध्यक्ष असून, सामाजिक न्याय विभागाचे सहआयुक्त (शिक्षण) प्रमोद जाधव आणि उपायुक्त वंदना कोचुरे या सदस्या आहेत, तर आदिवासी विकास आयुक्तालयाचे साहाय्यक प्रकल्प अधिकारी विनोद करडमारे सदस्य सचिव आहेत. समितीने दोन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांशी संबंधित सर्व योजनांचा अभ्यास करून आर्थिक मदत आणि सोयी-सुविधांमधील तफावत दूर करून त्यामध्ये एकवाक्यता आणण्यासाठी राज्य शासनाला स्पष्ट शिफारशी करणार आहे. समितीला नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे बंधन शासनाकडून घालण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताचा किरकोळ महागाई दर वाढला! सलग तिसऱ्या महिन्यात किंमती वाढलेल्याच, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर काय?

VAIBHAV SOORYAVANSHI: संजू सॅमसन की वैभव सूर्यवंशी? दुसऱ्या टी-२०आधी टीम इंडियासमोर मोठा सवाल; ‘या’ समस्येचाही शोधावा लागणार उपाय

Vastu Tips: घरात मांजर पाळताय? मांजर पाळण्यापूर्वी जाणून घ्या वास्तुचे 'हे' नियम; नाहीतर वाढेल नकारात्मक ऊर्जा!

Interesting Money Story: कुत्र्याला फिरवायला गेले अन् नशीबच पालटलं! ना लॉटरी, ना वारसा... एका क्षणात झाले करोडपती; नेमकं काय घडलं?

अंकिता वालावलकरने गणेशोत्सवादिवशीच दिली गुडन्यूज, मुंबईत घेतलं स्वतःचं घर; कुठे आहे तिचा २ बीएचके? म्हणते- सध्या इंटेरिअर...

SCROLL FOR NEXT