फुलवडे, ता. १० : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्ट्रॉबेरी प्रात्यक्षिक लागवड किट, अस्तरीकरणासह नवीन शेततळे निर्मिती तसेच अस्तित्वात असलेल्या शेततळ्यांचे अस्तरीकरण (कुंपणासह) या घटकांना लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे. इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी १६ सप्टेंबर अखेरपर्यंत कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज करावा, असे आवाहन आंबेगाव तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी केले आहे.
अनुदानाचे स्वरूप -
अ.क्र.............योजनेचा घटक............अनुदान टक्केवारी............कमाल अनुदान
१............स्ट्रॉबेरी प्रात्यक्षिक लागवड किट............९० टक्के............५०,६६०/- (प्रति १० गुंठे)
२. ............अस्तरीकरणासह नवीन शेततळे निर्मिती............९० टक्के............२,६९,६८०/-
३.............अस्तित्वात असलेल्या शेततळ्याचे अस्तरीकरण............९० टक्के............१,३८,६०९/-
• प्रमुख अटी व शर्ती -
१. अर्जदार आदिवासी शेतकरी असावा व यापूर्वी स्ट्रॉबेरी लागवडीसाठी इतर योजनेतून लाभ घेतलेला नसावा.
२. योजनेतील कोणत्याही घटकाचा लाभ घेण्यासाठी स्ट्रॉबेरी प्रात्यक्षिक लागवड हा घटक अनिवार्य आहे.
३. स्ट्रॉबेरी लागवड घटकासोबत अस्तरीकरणासह नवीन शेततळे निर्मिती किंवा अस्तित्वातील शेततळ्याचे अस्तरीकरण यापैकी एका घटकाचा लाभ घेता येईल.
४. तालुकानिहाय वितरित लक्षांकाप्रमाणे सोडतीद्वारे लाभार्थी निवड करण्यात येईल.
५. निवड झाल्यानंतर तांत्रिक निकषांनुसार विहीत कालावधीत काम पूर्ण करणे आवश्यक आहे.
६. मंजूर आराखड्यानुसार काम पूर्ण करून देयक अनुदानासाठी सादर करावे. मंजूर मापदंडापेक्षा अधिकचा खर्च लाभार्थ्याने स्वतः करावा.
७. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे ७/१२, ८-अ, आधार कार्ड, जातीचा पुरावा/दाखला, बँक पासबुक झेरॉक्स, हमीपत्र इत्यादी सादर करावीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.