आदिवासी विकासाचा सप्ताहभर जागर
११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन
अहिल्यानगर, ता.१२ ः क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशात ‘जनजातीय गौरव दिन’ साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत विविध उपक्रमांनी जनजातीय गौरव सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, सांस्कृतिक अस्मिता, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि आर्थिक विकासाच्या संधी याबाबत जनजागृती करण्याबरोबरच शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर या सप्ताहात विशेष भर देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून भगवान बिरसा मुंडा यांची जयंती केवळ औपचारिक उत्सवापुरती मर्यादित न ठेवता आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी पर्व म्हणून साजरी करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने २०२१ पासून १५ नोव्हेंबर हा दिवस ''जनजातीय गौरव दिवस'' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतिकारकांनी दिलेले योगदान राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला आहे, अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया उपस्थित होते.
इन्फो
असे आहे कार्यक्रमांचे नियोजन
१३ नोव्हेंबर रोजी शासकीय योजनांचे वितरण आणि आर्थिक स्वावलंबन मार्गदर्शन करण्यात येईल. १४ रोजी आदिवासी स्मारकांची स्वच्छता आणि सांस्कृतिक अस्मितेचा जागर करण्यात येईल. १५ ला भगवान बिरसा मुंडा जयंतीचा मुख्य सोहळा साजरा होईल. १६ ला वनहक्क, कृषी आणि डिजिटल सक्षमीकरण कार्यक्रम होईल. १७ ला आरोग्य, पोषण आणि शैक्षणिक जनजागृती करण्यात येईल. १८ ला आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी मेळावे आयोजित करून सप्ताहाचा समारोप करण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.