पुणे

आदिवासी युवकांचा आयुक्तालयासमोर एल्गार

CD

नाशिक आयुक्तालयासमोर
आदिवासी युवकांचा ठिय्या
नाशिक, ता. २० : आदिवासी आश्रमशाळांतील पोषण आहारात बदल करणारा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी आदिवासी युवकांनी गुरुवारी पुन्हा आदिवासी विकास आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन केले. आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांच्यासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने लेखी आश्‍वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला.
आदिवासी विकास विभागाने प्रसिद्ध केलेला शासन निर्णय तातडीने रद्द करावा, सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनींच्या पालकांना भरपाई द्यावी, तसेच आदिवासी विकास मंत्री, सचिव आणि आयुक्तांनी राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी युवकांनी दोन दिवसांपूर्वी आयुक्तालयासमोर ठिय्या मांडला आहे. गुरुवारी दुपारी आंदोलनाला पुन्हा सुरुवात झाली. आंदोलकांनी प्रवेशद्वारावरच शासन निर्णयाची प्रत फाडून जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांनी वेळोवेळी आयुक्तालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आयुक्त बनसोड यांच्यासोबत झालेल्या चर्चेत आंदोलकांनी शासन निर्णय रद्द करण्याची मागणी लावून धरली. लेखी आश्‍वासनाशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतल्याने चर्चेत तोडगा निघाला नाही. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी प्रवेशद्वारावरच शासन निर्णयाची प्रत फाडून निषेध नोंदविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mehbooba Mufti: जम्मू काश्मीर भरताचाच अविभाज्य भाग म्हटलेल्या अमेरिकेच्या राजदूतांवर महबूबा मुफ्ती नाराज, स्पष्ट शब्दांत म्हणाल्या...

Mumbai News: कांजूरमार्गात धावत्या लोकलच्या छतावर चढला तरुण; OHE वीजपुरवठा बंद, रेल्वे सेवा विस्कळीत

Pune Civic Warning: पुण्यात खड्ड्यांचे साम्राज्य; आठ दिवसांत खड्डे बुजवा, नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलनाचा स्थायी समिती अध्यक्षांचा इशारा

Kondhwa Anti-Drug Action: कोंढव्यात अंमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; गांजा खरेदीसाठी आलेले ६१ जण ताब्यात, दोन सराईत विक्रेते अटकेत

Pune Noise Control: डीजे मुक्त गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा साऊंड तपासणी उपक्रम; कर्णकर्कश ध्वनी रोखण्यासाठी सर्वपक्षीय बैठक

SCROLL FOR NEXT