Sambhaji Bhide sakal
पुणे

Pune News : भिडे गुरुजींच्या गडकोट मोहिमेस आदिवासी संघटनांचा विरोध

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या श्री क्षेत्र भीमाशंकर ते वरसुबाई मार्गे शिवनेरी जुन्नर गडकोट मोहिमेस आदिवासी संघटनांनी विरोध केला

दत्ता म्हसकर

जुन्नर : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या श्री क्षेत्र भीमाशंकर ते वरसुबाई मार्गे शिवनेरी जुन्नर गडकोट मोहिमेस आदिवासी संघटनांनी विरोध केला आहे.बिरसा ब्रिगेड सह्याद्री,जुन्नर व क्रांतिकारी आदिवासी युवा प्रतिष्ठाण (KA ग्रुप) यांनी याबाबतचे निवेदन महसूल व पोलीस प्रशासनास दिले आहे.

ही धारातीर्थ गडकोट मोहीम २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. आदिवासी क्षेत्रातून होणाऱ्या गडकोट मोहिमे दरम्यान काही गावामध्ये मुक्काम होऊन तेथे सभा घेण्यात येणार आहेत. संबंधित व्यक्ती ही सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करणारी व्यक्ती म्हणून ओळखली जात आहे.यामुळे ह्या विनापरवानगीच्या मोहिमेस व सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या भाषणावर बंदी आणावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

गडकोट मोहिमेच्या मार्गात बहुसंख्य आदिवासी समाज राहत असून तो शांतताप्रिय आहे. कोणत्याही सामाजिक धार्मिक संघर्षात नसलेल्या समाजात भिडे यांच्या भडक भाषणांमुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाने ह्या मोहिमेवर बंदी आणावी असे निवेदनात म्हटले आहे.

भीमाशंकर ते जुन्नर हे आदिवासी बहुल क्षेत्र राज्यघटनेतील अनुच्छेद २४४ अंतर्गत येत असून या क्षेत्रात पेसा कायदा लागू आहे. पेसा ग्रामसभांना या क्षेत्रात विशेष अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. या क्षेत्रातील ग्रामसभांच्या परवानगीशिवाय या क्षेत्रात प्रवेश तसेच धार्मिक प्रचार व प्रसार करता येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने संविधानिक कायदे व अधिकार यांचे रक्षण करावे.

राज्यघटनेतील अनुच्छेद २४४ , १३(३)क , व १९ (५) यांचे संभाजी भिडे यांच्याकडून कायद्याचे उल्लंघन होऊ शकते. शांतताप्रिय आदिवासी समाज यामुळे आक्रमक होऊ शकतो याची खबरदारी घेऊन पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊन योग्य ती कारवाईची मागणी निवेदनात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT