Mahametro
Mahametro sakal
पुणे

ट्रो स्टेशन परिसरात टीओडी झोन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सुमारे सात हजार चौरस किलोमीटर हद्दीसाठी पीएमआरडीएने यापूर्वी ‘एल ॲण्ड टी’ कंपनीकडून तयार करून घेतलेल्या सर्वंकष वाहतूक आराखड्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमार्गासह अन्य आठ मेट्रो मार्गांचा समावेश प्रारूप विकास आराखड्यात केला आहे. तर पहिल्या टप्प्यात हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर स्टेशनच्या ५०० मीटर परिसरात ‘टीओडी’ झोन प्रस्तावित केला आहे. भविष्यात अन्य मेट्रो मार्गावरही हा झोन प्रस्तावित करण्याची तरतूद केली आहे. (Pune Metro News)

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) यापूर्वीच ‘एल ॲण्ड टी’ कंपनीकडून सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करून घेतला आहे. यात हिंजवडी ते शिवाजीनगरसह नव्याने आठ मेट्रो मार्ग आणि स्वारगेट, शिवाजीनगर, बालेवाडीसह निगडी, नाशिक फाटा, हिंजवडी, चांदणी चौक, वारजे, वडगाव बुद्रूक, खराडी, पुलगेट आणि वाकड अशा ठिकाणी ‘मल्टिमोडल हब’ विकसित करण्याची शिफारस केली होती. त्या अहवालाचा समावेश प्रारूप विकास आराखड्यात केला आहे.

आठ मेट्रो मार्गांची तरतूद

‘पीएमआरडीए’ने पहिल्या टप्प्यात २३ किलोमीटर लांबीच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले. या मार्गावरील स्टेशनच्या ५०० मीटर परिसरात टीओडी झोन प्रारूप विकास आराखड्यात प्रस्तावित केला आहे. तर भविष्यात हाती घेण्यात येणाऱ्या आठ मेट्रो मार्गांची तरतूद विकास आराखड्यात केली आहे. हे प्रस्तावित मेट्रो मार्ग हाती घेतल्यानंतर तेथेही टीओडी झोन लागू करणे आराखड्यात प्रस्तावित केले आहे. त्यामुळे भविष्यात १९५ किलोमीटर परिसरात हा झोन लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गांवरील स्टेशनच्या ५०० मीटर परिसरात टीओडी झोन प्रस्तावित केला आहे. तसेच, ‘एल ॲण्ड टी’ या कंपनीने केलेल्या हद्दीच्या सर्वंकष वाहतूक आराखड्यात आठही मेट्रो मार्ग प्रस्तावित केले आहेत. भविष्यात ते मार्ग विकसित करण्यासाठी हाती घेतल्यानंतर तेथेही टीओडी झोन लागू करणार आहे.

- अभिराज गिरकर, महानगर नियोजनकार, पीएमआरडीए

विकास आराखड्यात काय प्रस्तावित?

१) शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाव्यतिरीक्त चार मार्गांवर मेट्रो प्रकल्प, तर चार मार्गांवर लाइट मेट्रो

२) स्वारगेट ते खडकवासलादरम्यान नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता), वारजे ते स्वारगेट, वाघोली ते पवार वस्ती (हिंजवडी) आणि चांदणी चौक ते हिंजवडी असे चार मार्ग.

३) मेट्रोसाठी आवश्‍यक प्रवासीसंख्या नसल्याने त्यापेक्षा कमी खर्चामध्ये हे पर्याय प्रस्तावित

४) मेट्रो आणि लाइट मेट्रो मिळून सुमारे १९५ किलोमीटर लांबीचे मेट्रो प्रकल्पाचे जाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT