truck bumped women and small girl dies pune accident Sakal
पुणे

Pune Accident News : ट्रकच्या धडकेने महिलेसह सहावर्षीय बालिकेचा मृत्यू

भरधाव ट्रकने एका महिलेसह सहावर्षीय बालिकेला धडक दिल्यामुळे दोघींचा मृत्यू झाला. ही दुर्घटना नऱ्हे आंबेगाव परिसरातील भूमकर पुलाजवळ बाह्यवळण मार्गावर घडली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भरधाव ट्रकने एका महिलेसह सहावर्षीय बालिकेला धडक दिल्यामुळे दोघींचा मृत्यू झाला. ही दुर्घटना नऱ्हे आंबेगाव परिसरातील भूमकर पुलाजवळ बाह्यवळण मार्गावर घडली.शीतल सिद्धराम पाटील (वय ४२) आणि अबोली सूरज शेटके (वय ६) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी रोहन सिद्धराम पाटील (वय १९, रा. नऱ्हे) याने सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून ट्रकचालक पांडुरंग सुनील पिनाटे (वय २८, रा. तुगाव, ता. भालकी, जि. बिदर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहन, त्याची आई शीतल आणि भाची अबोली हे तिघेजण शनिवारी (ता. २७) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरला निघाले होते.

पाटील कुटुंबीय भूमकर पुलाजवळ रस्त्याच्या कडेला बसची वाट पाहत थांबले होते. शीतल यांनी भाची अबोलीला कडेवर घेतले होते. त्यावेळी भरधाव ट्रकचालकाने शीतल आणि अबोलीला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान दोघींचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अस्मिता लाड करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment : एमपीएससीच्या कारभारावर आक्षेपांचा पाऊस ; नागपूर विभागातून सर्वाधिक ७, ६०० ई-मेल ; व्ही. राधा यांची माहिती

Asian Games Nagoya : भारतीय खेळाडूंच्या आगमनात अडथळे ; आशियाई क्रीडा स्पर्धा ; खेळाडूंना क्रुझवरील रूम्स मिळण्यासाठी कसरत

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

SCROLL FOR NEXT