पुणे

वाढेगाव येथे ट्रक व कारच्या अपघातात महिलेचा मृत्यू; तिघेजण गंभीर

CD

ट्रक-कारच्या अपघातात
एकाचा मृत्यू, तीन गंभीर
राष्ट्रीय महामार्गावरील वाढेगावात दुर्घटना
सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. २४ : ट्रक व कारच्या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून, कारमधील इतर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग १६६ वर वाढेगाव (ता. सांगोला) येथील राज लॉजजवळ मंगळवारी (ता. २४) पहाटे घडला आहे. देवका पिंटू सोरटे (वय ३६, रा. करवीर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत सांगोला पोलिस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवका सोरटे या व त्यांच्या समवेत इतर मंगळवारी पहाटे सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास चारचाकी वाहनाने कोल्हापूरकडे जात होत्या. सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथील राष्ट्रीय महामार्ग १६६ वर राज लॉजजवळ ट्रक व कारचा अपघात झाला. अपघातात देवका सोरटे गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर विशाल चंद्रकांत गडहिरे यांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, सांगोला येथे दाखल केले. मात्र सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. अपघातग्रस्त कारमधील इतर तिघेजणही गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या अपघाताचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल बनसोडे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: 'व्हीएसआर'च्या विमान उड्डाणांवर बंदी; बारामती विमान अपघात प्रकरणी DGCAची मोठी कारवाई

Pune Crime : बारावीचा पेपर संपताच कोथरूडमध्ये विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; दोन अल्पवयीन ताब्यात

Fruit Drink Maaza: 'माझा'च्या छोटा पॅकमध्ये आढळली घाण; ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली

Kukadi Project : कुकडी प्रकल्पातून उन्हाळी पहिल्या आवर्तनात 7.6 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय

Katraj Accident : कात्रज बोगद्याजवळ दरीपुलावर अपघातात ट्रक चालक ठार, सातजण जखमी

SCROLL FOR NEXT