पुणे

पाचगणी : पाचगणी-पाचवड मार्गावर महू धरणाजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी

CD

महू धरणाजवळ ट्रक पलटला

​पाचगणी, ता. ५ : पाचगणी-करहर मुख्य रस्त्यावर असलेल्या महू धरणाच्या भिंतीजवळील धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने एक ट्रक पलटी झाला. काल रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास ही घटना घडली असून, यामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तर चालक किरकोळ जखमी झाला आहे.

सध्या महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्याने अनेक वाहनचालक पर्यायी मार्ग म्हणून पाचगणी-पाचवड मार्गाचा वापर करत आहेत. ट्रक (टीएन ८८ एम ७३२४) पाचवडच्या दिशेने जात होता. रात्रीच्या वेळी या मार्गावरील महू धरणाच्या भिंतीजवळील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्यावरच पलटी झाला. ​हा ट्रक स्ट्रॉबेरी घेऊन जात होता. अपघातानंतर ट्रकचे केबिन पूर्णपणे दबले गेले असून, इंजिनचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने, चालकाला वेळीच बाहेर काढण्यात यश आले असून, त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. मात्र, स्थानिकांच्या मदतीने रस्ता मोकळा करण्यात आला.


07389
महू : धरण परिसरात अपघातग्रस्त झालेला ट्रक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRPF Recruitment Row : एसआरपीएफ पोलिस भरती पेपरात ८५ प्रश्न ‘कॉपी-पेस्ट’; राज्यभर संताप, युद्धपातळीवर चौकशी सुरू

मी राजीनामा देणार नाही, भाजपने कट रचून हरवलंय; ममता बॅनर्जींचे गंभीर आरोप, पराभवानंतर घेतली पत्रकार परिषद

दररोज १५० बालकांवर अत्याचार; समाज अजूनही का गप्प? बालसुरक्षेचा ज्वलंत प्रश्न ऐरणीवर; धक्कादायक आकडेवारी समोर

Business Scheme: बिझनेस सुरू करायचाय? सरकारच्या या 5 योजना बदलतील तुमचं नशीब, मिळू शकतं तब्बल 2 कोटींपर्यंत कर्ज!

Latest Marathi News Live Update : पुरंदर विमानतळ जमीन अधिग्रहण शेवटच्या टप्प्यात

SCROLL FOR NEXT