पुणे

जैन मुनी प्रवचन

CD

सुख संपत्तीत नसून संतोषात
क्रोध, मान, माया आणि लोभ हे चार कषाय आहेत. त्यापैकी लोभ सर्वाधिक धोकादायक आहे. लोभी व्यक्तीला कितीही संपत्ती मिळाली तरी समाधान मिळत नाही. ‘अधिक हवे’ या इच्छेमुळे तो सतत धावपळ करीत राहतो आणि सुखापासून दूर जातो, असे मुनिश्री प्रशांतरत्न विजय यांनी सांगितले. श्री आदिनाथ जैन श्वेतांबर मंदिर, जोडभावी पेठ येथे सुरू असलेल्या चातुर्मासिक प्रवचनात ते बोलत होते. समुद्रात कितीही नद्यांचे पाणी आले तरी तो तृप्त होत नाही, त्याप्रमाणे लोभाचे पोटही कधीच भरत नाही. रोडपतीला करोडपती, तर करोडपतीला अब्जपती होण्याची इच्छा असते. त्यामुळे सुख संपत्तीत नसून संतोषात आहे, आपल्या भाग्यावर विश्वास ठेवून मिळालेल्या गोष्टींत संतोष मानावा, लोभावर नियंत्रण ठेवावे आणि मनःशांती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.
-----------------------
ध्येय नसेल तर प्रगतीच होणार नाही
जीवनात ध्येय निश्चित नसेल तर दिशा मिळत नाही आणि दिशेशिवाय गती व प्रगती शक्य नाही. ध्येयहीन माणूस प्रगतीच्या मार्गावर असल्याचे मानत असला, तरी तो एकाच जागी उड्या मारत असतो, असे प्रतिपादन परमपूज्य साध्वी अक्षयश्री म.सा. यांनी केले. बलिदान चौक येथील जैन स्थानकात आयोजित अक्षय चातुर्मासात त्या बोलत होत्या. चित्त स्थिर आणि वृत्ती एकाग्र नसल्याने माणूस ध्येयापासून भरकटतो. त्यामुळे अनावश्यक इच्छांना लगाम घालून ध्येय निश्चित करावे. गुरूचरणी श्रद्धा ठेवून संतदर्शन व प्रवचनाचा लाभ घेतल्यास आत्मकल्याणाचा मार्ग सापडतो, असे त्यांनी सांगितले. सत्य माहीत असते; परंतु सत्य स्वीकारण्यास व्यक्ती तयार नसते. ज्याचा जन्म झाला आहे, त्याचा मृत्यू होणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मृत्यूचे नुसते नाव ऐकले तरी व्यक्ती बेचैन होते. सत्य माहीत असूनही आपण असत्य पांघरून वावरत असतो, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCA च्या किचनला ८७ गुण, तरी FDAची कारवाई; हायकोर्टाने घेतला आक्षेप, ५ लायसन्सवरील निलंबन हटणार

Success Story: वय 16, कंपनीत 15 कर्मचारी अन् वडिलांनाच देतो 2 लाखांचा पगार! केरळच्या या ‘AI Kid’ची भन्नाट कहाणी

Ather Konark Electric Scooter Launch : एथर एनर्जीची ‘कोनार्क’ इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; 200 किमीपर्यंत रेंज, बॅटरीवर 10 वर्षांची वॉरंटी

MPSC Exam : कोणताही क्लास न लावता ऋषीकेश राज्यात पहीला; उद्योग निरीक्षक व दुय्यम अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्कपदी निवड

Mamata Banerjee: मोठी बातमी! ममता बॅनर्जींसह तृणमूल काँग्रेसच्या बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल; पोलिसांनी स्वतः घेतली दखल

SCROLL FOR NEXT