पुणे

सरसंघचालक- मुख्य बातमी

CD

हेड
खरे नेतृत्व म्हणजे
भाषणे देणे नव्हे

सबहेड
सरसंघचालक ः नेतृत्वाने नवे नेते घडवावेत

सकाळ न्यूज नेटवर्क-पीटीआय
मुंबई, ता.६ ः ‘‘केवळ भाषणे देणे, निवडणुका जिंकणे किंवा लोकांना उपदेश करणे म्हणजे खरे नेतृत्व नव्हे. पडद्यामागून काम करणे, यश आणि प्रसिद्धी सर्वांमध्ये वाटून घेणे, हे खऱ्या नेतृत्वाचे गुण आहेत, नेतृत्वाने नवे नेते घडवावेत,’’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज केले.
‘इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाइट नेशन्स’ (आयआयएमयूएन) या संस्थेच्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ येथे आयोजित वार्षिक चॅम्पियनशिप परिषदेत ते बोलत होते. ‘आयआयएमयूएन’चे संस्थापक ऋषभ शहा यांनी भागवत यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमाला देशातील शंभरहून अधिक शहरांतील १५ ते १९ वर्षे वयोगटातील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. ‘‘जेन-झी ही नवी प्रामाणिक पिढी आहे. त्यामुळे माझा त्यांच्यावर आंधळा विश्वास आहे,’’ असे भागवत म्हणाले. ‘‘विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे आणि संवादातूनच समस्यांवर तोडगा निघू शकतो,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.


आंदोलक मुले आपलीच
दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करताना भागवत म्हणाले, ‘‘विद्यार्थी एखाद्या प्रश्नासाठी आंदोलन करत असतील तर त्यांना राष्ट्रविरोधी म्हणता येणार नाही. ती आपलीच मुले आहेत. लोकशाहीत आंदोलन हेही संवादाचे एक माध्यम आहे. आंदोलनात गैर काही नाही; मात्र त्याचा उपयोग समाजात फूट पाडण्यासाठी होता कामा नये.’’

शिक्षण धोरणात सुधारणा हवी
शिक्षण व्यवस्थेत बदल करण्याची मागणी युवा आंदोलकांनी लावून धरली होती, त्यांच्या या आंदोलनामागील उद्देश योग्य असल्याचे भागवत यांनी सांगितले. भारताच्या शिक्षण धोरणात अद्याप अनेक सुधारणांची गरज असून त्यावर व्यापक चर्चा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

भागवत उवाच

- विद्यार्थ्यांवरील लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापराबाबत भागवत म्हणाले, की, या घटनेची संपूर्ण माहिती नसल्यामुळे भाष्य करणे योग्य ठरणार नाही. लाठीमार का झाला किंवा पॅलेट गनचा वापर झाला का, याबाबत मला तथ्यांचा अभ्यास करावा लागेल. मात्र जेन- झी ही प्रामाणिक पिढी असल्याने माझा त्यांच्यावर आंधळा विश्वास आहे.

- शिक्षण क्षेत्रात व्यापक सुधारणांची गरज व्यक्त करताना त्यांनी शिक्षणाचे व्यापारीकरण होऊ नये आणि प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, यावर भर दिला. शैक्षणिक शुल्क संरचनेचा फेरविचार, शिक्षक प्रशिक्षणात सुधारणा आणि शाळांच्या विकासात लोकसहभाग वाढविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. देशाच्या एकूण अर्थसंकल्पापैकी किमान सहा टक्के निधी शिक्षणासाठी खर्च करण्याच्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला.

- भारताचे पाकिस्तान आणि चीनशी संबंध, महिला सक्षमीकरण, हवामान बदल आणि नेतृत्व या विषयांवरही भागवत यांनी भूमिका मांडली. संघर्षाच्या काळात सरकारच्या निर्णयांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज व्यक्त करतानाच शेजारी देशांशी संवाद कायम ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

- महिला समाजातील समान आणि परस्परपूरक घटक असल्याचे भागवत यांनी नमूद केले. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सध्याचे विकास मॉडेल टिकाऊ नसल्याचे सांगत सरकारवर सकारात्मक दबाव निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले. समाजमाध्यमांचा सर्वांनीच जबाबदारीने वापर करावा, असे ते म्हणाले.

- समाजामध्ये असमानता असेपर्यंत आरक्षणाची गरज लागेलच. काही घटक आरक्षणामुळे पुढारलेले आहेत तर काही उपेक्षित राहिले आहेत, त्यामुळे समाजात आता या उपेक्षित घटकांकडून आवाज उठविला जात आहे. ज्याने लाभ घेऊन विकास केला त्यांनी आरक्षणाचा काही भाग इतर उपेक्षितांना सोडला तर सर्व घटक समान पातळीवर येण्याचा मार्ग निर्माण होऊ शकतो. आरक्षणासंदर्भात जे राजकारण होते ते सोडले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Gavit: सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला अडीच तास ताटकळत ठेवलं! दिलीप गावित यांचा राज ठाकरेंवर संताप

Karamad-Ladsawangi Accident : करमाड–लाडसावंगी रस्त्यावरील खड्ड्यांचा तिसरा बळी; भरधाव टेम्पोच्या धडकेत ७९ वर्षीय वृद्धेचा मृत्यू, चालक फरार

Marathi News Live Updates: प्रत्येकाने संविधानावर बोलायलाच हवे - पंकजा गोपीनाथ मुंडे

Godavari Fisherman Electrocuted: गोदावरीच्या पुरात मासेमारी करताना मच्छीमाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; नदीत उतरलेल्या वीजप्रवाहावरून ग्रामस्थांचा संताप

Rajgad Khopadewadi funeral crisis: राजगड परिसरातील खोपडेवाडीत ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार; स्मशानभूमीअभावी ग्रामस्थांचा संताप उफाळला

SCROLL FOR NEXT