पुणे

चर्चा सकारात्मक, दौरा अनुत्पादक

CD

बीजिंग, ता. १५ (पीटीआय) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुचर्चित चीन दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी त्यांची चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या दौऱ्याचे वर्णन दोन्ही नेत्यांनी ‘ऐतिहासिक’ आणि ‘मैलाचा दगड’ असे केले असले तरी दोन्ही देश आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने कोणत्याही वादग्रस्त मुद्द्यावर तोडगा निघाला नाही की कोणत्याही कराराची ठोस घोषणा करण्यात आली नाही. हा दौरा आटोपून ट्रम्प मायदेशी रवाना झाले.
ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात गुरुवारी झालेल्या चर्चेत तैवानच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका मांडल्या गेल्यानंतर आज हलक्याफुलक्या वातावरणात चर्चा झाली. बीजिंगमधील ‘झोंगनानहाई’ या अतिसुरक्षित निवासस्थानी झालेल्या खासगी भेटीने या चर्चेचा समारोप झाला. यावेळी दोन्ही नेत्यांनी उद्यानात फेरफटका मारत विविध विषयांवर संवाद साधला. ट्रम्प यांनी हा दौरा ‘अत्यंत यशस्वी आणि अविस्मरणीय’ असल्याचे म्हटले. जिनपिंग यांचा उल्लेख ‘जुने मित्र’ असा करत ट्रम्प यांनी त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. तसेच, भविष्यातही असाच सखोल संवाद सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त करत त्यांनी जिनपिंग यांना अमेरिकाभेटीचे निमंत्रण दिले. तर, जिनपिंग यांनी ट्रम्प यांच्या दौऱ्याचे स्वागत करताना, उभय देशांनी धोरणात्मक स्थैर्यासाठी आणि विधायक संबंधांसाठी एक नवी दृष्टी समोर ठेवल्याचे सांगितले. आर्थिक आणि व्यापारी संबंध स्थिर ठेवण्यावर तसेच विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावर आमचे एकमत झाले आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या समस्यांचे योग्य निराकरण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

निर्बंध अमान्यच
डोनाल्ड ट्रम्प यांनी जिनपिंग आणि त्यांच्या पत्नीला २४ सप्टेंबरला अमेरिकेच्या दौऱ्यावर येण्याचे निमंत्रण दिले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ऊर्जा पुरवठ्यासाठी खुली ठेवण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले आहे. मात्र, अमेरिकेने लादलेले निर्बंध, सेमीकंडक्टर चिपची निर्यात आणि दुर्मिळ धातूंचा पुरवठा यांसारख्या कळीच्या मुद्द्यांवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने कोणतीही स्पष्ट माहिती देण्याचे टाळले.

इराणला इशारा
चीन दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इराणला इशारा दिला. ‘नष्ट झालेला देश’ असा इराणचा उल्लेख करताना ट्रम्प यांनी, ‘करार करा, किंवा नष्ट व्हा’ अशा अत्यंत कठोर शब्दांत इराणला इशारा दिला आहे. अमेरिका इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे मिळवू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांनाही अमेरिका-इराण यांच्यात शांततापूर्ण करार व्हावा असे वाटते आणि चीन इराणला लष्करी सामग्री पुरवणार नाही, असे आश्वासन मिळाल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. आगामी काळात चीन अमेरिकेकडून २०० बोईंग विमाने, मोठ्या प्रमाणात तेल आणि कृषी उत्पादने खरेदी करण्यास तयार असल्याचेही ट्रम्प म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेला पुन्हा महान बनवू इच्छितात, तर मी चिनी जनतेला राष्ट्रीय पुनरुज्जीवनाकडे नेण्यासाठी कटिबद्ध आहे. सहकार्य वाढवून दोन्ही देश प्रगती करू शकतात.
- शी जिनपिंग, चीनचे अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT