पुणे

अमेरिकेतील मांस, पोल्ट्रीसाठी चिनी बाजारपेठ खुली ‘व्हाइट हाउस’चा दावा; कृषी व्यापारातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सकारात्मक

CD

वॉशिंग्टन, ता. १८ (पीटीआय) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील शिखर परिषदेनंतर दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. चीनने अमेरिकेतील गोमांस आणि पोल्ट्री उत्पादनांसह इतर कृषी मालाची आयात वाढवण्यास संमती दिली असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. यानुसार, चीन २०२६ पासून दरवर्षी १७ अब्ज डॉलर किमतीचा शेतीमाल अमेरिकेकडून खरेदी करणार असून, ही खरेदी २०२७ आणि २०२८ मध्येही याच स्तरावर कायम राहणार आहे.
गेल्या वर्षी सुरू झालेल्या व्यापार युद्धामुळे अमेरिकेतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. हा परिणाम कमी करण्याचा ट्रम्प यांनी चीनदौऱ्यात प्रयत्न केला. ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात झालेल्या चर्चेनंतर, चीन अमेरिकी गोमांसासाठी आपली बाजारपेठ पुन्हा खुली करणार आहे. तसेच, अमेरिकेच्या कृषी विभागाने बर्ड फ्लू मुक्त घोषित केलेल्या राज्यांमधून पोल्ट्री उत्पादनांची आयात पुन्हा सुरू केली जाईल. मागील वर्षी चीनने सोयाबीन खरेदीचे जे आश्वासन दिले होते, त्याव्यतिरिक्त ही अतिरिक्त खरेदी असणार आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयानेही ‘व्हाइट हाऊस’च्या घोषणेला दुजोरा दिला असून, दोन्ही देश कृषी उत्पादनांच्या व्यापारातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. यामध्ये दुग्धजन्य पदार्थ, सी-फूड आणि बोन्साय झाडांच्या निर्यातीबाबतही चर्चा होणार आहे.
अमेरिकेच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये चीनला होणारी कृषी निर्यात ३८ अब्ज डॉलर होती. ती २०२५ मध्ये घटून आठ अब्ज डॉलरवर आली होती. विशेषतः सोयाबीन उत्पादकांना याचा मोठा फटका बसला होता.

‘इराणला सहकार्य नाही’
इराणला कोणत्याही प्रकारचे सहकार्य न देण्याचे आश्वासन चीनने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिल्याचा दावा अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमीसन ग्रीर यांनी आज केला. ग्रीर म्हणाले की, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी ट्रम्प यांनी चीनकडे थेट मदत मागितली नव्हती. इराणला चीनकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळू नये, यावर त्यांचा भर होता आणि त्याबाबतचे आश्वासन त्यांनी मिळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT