अमरावती - राज्यस्तरीय धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारी तृप्ती चषकासह.
अमरावती - राज्यस्तरीय धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारी तृप्ती चषकासह. 
पुणे

‘कोहिनूरचा हिरा’ चमकतोय, पण...

प्रवीण खुंटे

पुणे - कानाने ऐकू येत नाही आणि तोंडाने बोलताही येत नाही... पण पायातील ताकदीच्या जोरावर मात्र तिने वेगाला जिंकले... जन्मत:च कर्णबधिर असलेल्या तृप्ती पाटोळे (वय १७) हिने राज्यस्तरीय विशेष मुलांच्या स्पर्धेमध्ये धावण्यात दोन गटांतून बाजी मारली आहे. मात्र, या उदयोन्मुख खेळाडूच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे एका खेळाडूला आवश्‍यक असणारा पोषण आहार तिला मिळत नाही. शाळेसाठी ‘कोहिनूर हिरा’ म्हणून ओळख असलेल्या तृप्तीची ही यशोगाथा अन्‌ खंतसुद्धा... 

जन्मतःच कर्णबधिर असलेली तृप्ती पाटोळे (वय १७) महात्मा गांधी रस्त्यावरील रेड क्रॉस कर्णबधिर विद्यालयातील दहावीत  शिकत आहे. घोरपडी येथील झोपडपट्टीत राहणारी तृप्ती व तिची मोठी बहीण प्रणिताही जन्मतःच कर्णबधिर आहे. असे असले तरी या दोघी शिक्षणात कुठेही मागे पडू नये म्हणून त्यांच्या पालकांची धडपड सुरू आहे. अमरावती येथे नुकत्याच झालेल्या विशेष मुलांच्या राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धांमध्ये तृप्तीने १०० आणि २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला. सध्या दहावीच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित केले असून त्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे तृप्ती हिने सांकेतिक भाषेत सांगितले. क्रीडा शिक्षक प्रशांत गडदे म्हणाले, ‘‘तृप्तीने सहावीपासून जिल्हा आणि राज्यपातळीवरील धावण्याच्या स्पर्धेत एकदाही पहिला क्रमांक सोडला नाही.  तृप्ती म्हणजे चोवीस वर्षांच्या कारकिर्दीत मला सापडेला ‘कोहिनूरचा हिरा’ आहे.’’

माझ्या दोन्ही मुली कर्णबधिर आहेत. पण त्याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही. त्या दोघीही हुशार असून सामान्य मुलांच्या तुलनेत त्या कुठेही कमी नाहीत. 
- श्‍याम पाटोळे, तृप्तीचे वडील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT