पुणे

सभासदांचा विश्वास हीच व्यापारी पंतसंस्थेची खरी ताकद चेअरमन उत्तम डाके.

CD

सभासदांचा विश्वास हीच
व्यापारी पतसंस्थेची खरी ताकद
उत्तम डाके ः सभासद प्रशिक्षण उत्साहात
बेलवंडी, ता. ७ ः सभासद, ठेवीदार आणि कर्जदार यांनी संस्थेवर दाखवलेला विश्वास हीच व्यापारी पतसंस्थेची खरी ताकद आहे. स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेने सभासदांचे हित जोपासण्याला प्राधान्य दिले असून, पारदर्शक कारभार आणि सूक्ष्म नियोजनाच्या जोरावर संस्थेची प्रगती सुरू आहे. सर्वांनी संस्थेवर ठेवलेला विश्वास आम्ही सातत्याने सार्थ ठरवू, असे प्रतिपादन व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष उत्तम डाके यांनी केले.

येथील व्यापारी पतसंस्थेच्या वतीने १५ टक्के लाभांश वाटप, सभासद प्रशिक्षण आणि अवघ्या दहा मिनिटांत सोनेतारण कर्ज सुविधा या नवीन उपक्रमाचा प्रारंभ अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
डाके म्हणाले, की संस्था सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान देत आहे. सर्वसामान्य ग्रामस्थांसाठी अत्यल्प दरात रुग्णवाहिका, तसेच वैकुंठरथ उपलब्ध करून देण्यात आला आहे. सभासद, ठेवीदार आणि कर्जदार यांच्या हिताचा विचार करून त्यांना विमा संरक्षणही देण्यात आले असून, चालू आर्थिक वर्षात काही सभासद व कर्जदारांना विम्याचा लाभ मिळाला आहे.
या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सभासदांना १५ टक्के दराने तब्बल ६६ लाख ४० हजार रुपयांच्या लाभांशाचे वाटप करण्यात आले, तसेच संस्थेच्या नवीन सोनेतारण कर्ज सुविधेचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच ऋषिकेश शेलार, पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, सहायक निबंधक रावसाहेब खेडकर, श्रीगोंदे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माउली हिरवे, दिनेश इथापे, सुभाष काळाणे, विलास राजेभोसले, विजय काळाणे, अर्जुन हिवरकर, सोपान हिरवे, युवराज पवार, मोहन आढाव, भाऊसाहेब सिनारे, उपसरपंच बाळासाहेब ढवळे, दत्तात्रय हांडे, सोपानराव लोंढे, बाळासाहेब काकडे, अंकुश गुंजाळ, नंदकुमार सुपेकर, सुनील ढवळे, अर्जुन कोळसे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत खळबळ! पत्नीने AIच्या मदतीने रचला पतीच्या हत्येचा कट? ChatGPTच्या विरोधात खटला दाखल

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Latest Marathi News Live Update: पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल

Rohit Pathare case : २४ वर्षीय रोहित पठारेला घरातून उचललं, झाडाला बांधून बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

SCROLL FOR NEXT