पुणे

मंचर उपजिल्हा रुग्णालयात क्षयरोग रुग्णांना मिळणार दोन तासात रिपोर्ट; उपचारही होणार मोफत

डी. के. वळसे पाटील

मंचर : येथील उपजिल्हा रुग्णालयात जागतिक क्षयरोग दिनानिमित्त बुधवारी (ता. २४) क्षयरोगाचे निदान करण्यासाठी २४ लाख रुपये किंमतीचे सीबीनेट मशिन उपलब्ध झाले आहे. दोन तासात आजाराची चाचणी होणार आहे. या सुविधेचा फायदा आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यातील रुग्णांना होणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सीबीनेट मशिनचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबादास देवमाने यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योजिका नेत्रा शहा, रुग्ण कल्याण समिती सदस्य जगदीश घिसे,  डॉ गणेश पवार, डॉ. कैलास भागवत, संजय सोमवंशी पाटील, औषध निर्माता रत्नप्रभा वायकर-पडवळ, समुपदेशक सुहास मानेकर, परिचारीका कुंदा गारे, रंजिता वळवी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रकाश भंडारी उपस्थित होते.

“पूर्वी रुग्णांच्या थुंकीचे नमुने घेतल्यानंतर पुण्याहून १५ दिवसानंतर अहवाल प्राप्त होत होता. राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यामुळे सीबीनेट मशिन उपलब्ध झाले आहे. यामध्ये थुंकी नमुना तसेच इतर सॅम्पल मधून क्षयरोगाचे जंतू तपासले जातात. नविन प्रकारचा क्षयरोग (एमडीआर) औषधांना दाद न देणारा क्षयरोग याचे देखील निदान केले जाते. यामध्ये रुग्णांना लवकरात लवकर तपासणी करुन उपचार देणे सोयीचे होणार आहे. सदर तपासणी करीता खाजगी ठिकाणी तीन ते पाच हजार रुपये खर्च येतो. येथे तपासणीची सुविधा मोफत मिळणार आहे.” असे डॉ. देवमाने यांनी सांगितले. “या मशिनमुळे सीबीनॅट तपासणी सोबत एक्सरे तपासणी, एचआयव्ही तपासणी, विविध रक्ताच्या चाचण्या, कोविड ची तपासणी या सुविधा उपलब्ध असल्यामुळे रुग्णांना फायदा होणार आहे.” असे डॉ. पवार यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्यामध्ये १६३ क्षयरुग्णांची नोंद शासकीय व खाजगी माध्यमाव्दारे झालेली आहे. यामध्ये १६ रुग्ण हे एमडीआर व ३ रुग्ण हे एसडीआर याप्रकारातील आहेत. सदर रुग्णांनी यशस्वीरीत्या आरोग्य विभागामार्फत उपचार घेतलेला आहे. त्यासोबत निश्चय पोषण योजनेअंतर्गत उपचार चालू असेपर्यंत दरमहा ५०० रुपये रुग्णांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे. अशी माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सुरेश डेकळे यांनी दिली.

आठवडाभर खोकला, वजनात घट, रात्रीचा हलकासा ताप, भूक न लागणे, दोन मानेवर गाठी, रात्रीचा घाम येणे व छातीत दुखणे ही लक्षणे असल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. काही अडचण असल्यास तालुका क्षयरोग पर्यवेक्षक एस आर बो-हाडे व एस. पी. भागवत यांच्याशी संपर्क करावा. -डॉ. सुरेश ढेकळे, तालुका आरोग्य अधिकारी आंबेगाव

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT