पुणे

पिंपरीतील तुकाई देवीच्या मंदिरातून ७५० ग्रॅमचा चांदीचा मुखवटा लंपास; आषाढ यात्रेदरम्यान चोरी झाल्याने ग्रामस्थांत संताप

CD

PNE26W40321
वैराग : पिंपरी (पा.) येथील ग्रामदैवत श्री तुकाई देवीची मूर्ती.

तुकाई देवीच्या मंदिरातील चांदीचा मुखवटा चोरीला
आषाढ यात्रा सुरू असतानाच घटना; वैराग परिसरात खळबळ, ग्रामस्थांत संताप
सकाळ वृत्तसेवा
वैराग शहर, ता. ५ : वैरागजवळील पिंपरी (पा.) येथील ग्रामदैवत तुकाई देवीच्या मंदिरातील सुमारे ७५० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुखवटा अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. आषाढ यात्रा सुरू असतानाच मंदिरात चोरी झाल्याने ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये संतापाचे वातावरण असून, चोरट्याला तातडीने अटक करून मुखवटा परत मिळवण्याची मागणी होत आहे.
पिंपरी (पा.) येथील तुकाई मातेचे मंदिर सुमारे अडीचशे ते तीनशे वर्षे जुने असून हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या मंदिराची ख्याती आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवासह आषाढ यात्रेलाही येथे मोठी गर्दी होते. यंदाही यात्रेनिमित्त मंदिरात भाविकांची वर्दळ सुरू असतानाच चोरट्याने चांदीच्या मुखवट्यावर डल्ला मारला.
मंगळवारी दुपारी सुमारे चारच्या सुमारास दर्शनासाठी आलेल्या भाविकांना देवीच्या मूर्तीवरील चांदीचा मुखवटा दिसून आला नाही. त्यानंतर मंदिराचे पुजारी रामलिंग वायकर यांनी ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली.
गावातील तुकाई मातेच्या दोन मूर्तींपैकी एका मूर्तीवरील सुमारे ७५० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुखवटा चोरीला गेला आहे. विशेष म्हणजे मूर्तीवरील कवड्याची माळ, कंबरपट्टा तसेच बनावट सोन्याचे दागिने चोरट्याने जागेवरच ठेवले. घटना समोर आल्यानंतर ग्रामस्थांनी रात्रभर मंदिर परिसर, आजूबाजूची शेतजमीन आणि गावातील विविध ठिकाणी मुखवट्याचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. त्यानंतर वैराग पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच बार्शीचे पोलिस उपविभागीय अधिकारी सुहास जगताप, वैरागचे पोलिस निरीक्षक अमूल कादबाने, पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव, पोलिस उपनिरीक्षक विक्रम वडणे तसेच पोलिस कॉन्स्टेबल अमोल भोरे यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : कॅनडामध्ये विमान अपघातात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Satara News: हरवलेली लेक अन् काळजीत आई; शिंगणापूर पोलिसांच्या तत्परतेने पुन्हा घडली मायलेकींची भेट, काळोखात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT