केसनंद, ता. २० : तुळापूर (ता. हवेली) येथील शिवले वस्तीवर बुधवारी (ता. २०) पहाटे शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत दोन बैल आणि एका घोडीचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत शेतकरी पोपट राजाराम शिवले यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे चारच्या सुमारास जनावरांना चारा घातल्यानंतर काही वेळातच गोठ्याला आग लागली. आगीची तीव्रता इतकी होती की पशुधनाला बाहेर काढण्याची संधी मिळाली नाही. एका बैलाला वाचविण्यात यश आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बैलगाडाप्रेमी असलेल्या शिवले यांनी या जनावरांचा पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला होता, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी आणि तलाठ्यांनी पंचनामा केला. जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन शासनाकडे मदतीची मागणी केली आहे.
05556
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.