junnar
junnar 
पुणे

तुळजाभवानीचा पलंग जुन्नरहून तुळजापूरकडे मार्गस्थ

दत्ता म्हसकर

जुन्नर -  दहा दिवसांच्या वास्तव्यानंतर पारंपारिक वाद्याच्या गजरात, भंडारा-खोबऱ्याची उधळण करीत श्री तुळजाभवानी मातेचे पलंग आज मंगळवारी ता.25 रोजी जुन्नरहून तुळजापूरकडे मार्गस्थ झाला.

पलंगाची सकाळी मिरवणूक काढण्यात आली. या वेळी भाविकांनी घरासमोर सडा, रांगोळ्या, पायघड्या टाकून पलंगाचे स्वागत केले. गोंधळी,भराडी, संबळ वादयासह मिरवणुकीत सहभागी झाले होते. पलंगाची पूजा व दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

गणेशोत्सवाबरोबर साजऱ्या होणाऱ्या पलंगोत्सवासाठी घोडेगाव ता.आंबेगाव येथून पलंगाचे आगमन झाले होते. मंगळवारी तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढून पलंगावर मातेची विधिवत स्थापना करण्यात आली होती. दहा दिवस आरती, दुर्गासप्तशती पाठ, भजन, प्रवचन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी ता.24 रोजी होमहवन व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.

परंपरेनुसार पलंगाचे मानकरी बुट्टे पाटील, देशमुख कुटुंबाकडे तसेच अन्य भाविकांच्या घरासमोर पलंग मिरवणुकीने दर्शनासाठी नेला जातो. यानंतर पलंगाचे कुमशेत, आगर,नारायणगाव, आळेफाटा, राजुरी, नगर मार्गे तुळजापूरकडे मार्गस्थ होतो. भाविक घोडेगाव ते तुळजापूर पर्यन्त हा पलंग पायी वाहून नेतात. या प्रवासात पलंगाचे सर्वाधिक काळ जुन्नरला वास्तव्य असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT