MOD26A03551
तुळशी : येथे सुरू असलेल्या शिरपूर पॅटर्न कामाची पाहणी करताना आमदार सुभाष देशमुख, आमदार अभिजित पाटील व मान्यवर.
गाव नव्हे, तुळशीची उत्पादने बाजारात विका!
आमदार सुभाष देशमुख यांचे आवाहन; लोकमंगल फाउंडेशनकडून जलसंधारणाची कामे सुरू
मोडनिंब, ता. ३१ : ‘तुळशी गाव विकायला काढलं’ या प्रसारमाध्यमांतील बातम्यांनी लक्ष वेधले आणि मी या गावात आलो. पाण्याच्या टँकरवर जगणाऱ्या तुळशीतून दुधाचे टँकर बाहेर पडतात, हे पाहून आश्चर्य वाटले. येथील शेतकरी कष्टाळू आहेत. मात्र, कंटाळून ग्रामस्थांनी गाव विकायला काढले, हे लक्षात आले. आता गावात जलसंधारणाची कामे सुरू झाली आहेत. गाव विकण्याऐवजी गावाचा ब्रँड तयार करा आणि गावात उत्पादित होणारी उत्पादने बाजारात विका, असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
तुळशी येथे सुरू असलेल्या ‘शिरपूर पॅटर्न’च्या कामाची पाहणी करण्यासाठी आले असता ते बोलत होते. यावेळी आमदार अभिजित पाटील, भारत शिंदे, सरपंच डॉ. शरद मोरे, मनोज शहा, पांडुरंग गव्हाणे, प्रमोद वसेकर, बालाजी पाटील आदी उपस्थित होते.
तुळशी येथे गेल्या पंधरा दिवसांपासून शिरपूर पॅटर्ननुसार जलसंधारणाची कामे सुरू करण्यात आली आहेत. गावात १९ ठिकाणी ही कामे केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात भवानी पाझर तलावात लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी ७० फूट रुंद, ७५० फूट लांब आणि ३० फूट खोलीकरण करण्यात येत आहे. या तलावात सुमारे २५ कोटी लिटर पाणी साठणार आहे. या कामासाठी होणाऱ्या सुमारे ७० लाख रुपयांच्या खर्चाची जबाबदारी लोकमंगल फाउंडेशनने घेतली आहे.
-------------
कोट
- काम सुरू करताना खर्चाचा विचार केला नाही. पांडुरंगाला टपाल पाठवून तुळशीची व्यवस्था लाव, एवढेच सांगितले. त्याला सर्व काळजी आहे. अनेकांना सद्बुद्धी देऊन तोच मार्ग काढेल.
- सुभाष देशमुख, आमदार, दक्षिण सोलापूर
- लोकमंगल फाउंडेशनने पुढाकार घेऊन शाश्वत विकासाचे काम सुरू केले आहे. सरकारकडे आमचे प्रयत्न सुरू आहेतच; परंतु खासगी कंपन्यांनीही आपल्या सामाजिक बांधिलकीचा निधी तुळशीमध्ये खर्च करावा.
- अभिजित पाटील, आमदार, माढा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.