PNE26W28747
अहिल्यानगर ः चिन्मय मिशनतर्फे तुलसी रामायणावर आधारित सुंदरकांड ज्ञानयज्ञास प्रारंभ करण्यात आला.
रामायण भारतीय संस्कृतीचे तत्त्वज्ञान
अद्वैतानंद सरस्वती ः सुंदरकांड ज्ञानयज्ञास प्रारंभ
अहिल्यानगर, ता. २१ ः श्रीराम हे केवळ एका युगाचे नायक नसून, संपूर्ण मानवजातीसाठी आदर्श जीवनमूल्यांचे प्रतीक आहेत. रामायण ही केवळ कथा नसून, ती भारतीय संस्कृतीचे जीवन, तत्त्वज्ञान आहे. रामकथा कधीही जुनी होत नाही, कारण प्रत्येक पिढीला ती नवे संस्कार, नवी प्रेरणा आणि जीवन जगण्याची दिशा देत असते. चार वेद, उपनिषदे आणि सनातन संस्कृतीचा अमूल्य वारसा आपल्या समाजाला आजही टिकवून ठेवत आहे, असे प्रतिपादन व्यासपीठ चालक स्वामी अद्वैतानंद सरस्वती यांनी केले.
चिन्मय मिशनतर्फे आयोजित तुलसी रामायणावर आधारित सुंदरकांड ज्ञानयज्ञाच्या प्रारंभी ते बोलत होते. यावेळी स्वामी प्रत्ययानंद सरस्वती, महापौर ज्योती गाडे, मिशनचे अध्यक्ष ॲड. डी. डी. घोरपडे, उपाध्यक्ष विद्या हारदे, कोषाध्यक्ष उत्तमराव साळुंखे, सचिव देवराम मोरे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर व रामभक्त उपस्थित होते.
सरस्वती पुढे म्हणाले की, अशी कोणतीही जागा नाही जिथे प्रभू श्रीरामांचे अस्तित्व नाही. जगभरात रामायणाचा प्रभाव आणि महिमा पसरलेला आहे. भारताच्या सीमा ओलांडून अनेक देशांमध्ये रामायणाचा अभ्यास केला जातो. रामकथा ही मानवाला सदाचार, संयम, कर्तव्य आणि आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा देणारी आहे. त्यामुळेच रामायणाला जागतिक स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महापौर गाडे म्हणाल्या की, भगवद्गीता, रामायण आणि भारतीय संस्कृतीतील महान मूल्ये घराघरांत पोहोचविण्याचे मोलाचे कार्य मिशन करत आहे. धर्म, संस्कार आणि अध्यात्म यांचा प्रसार झाल्यास समाज अधिक सुदृढ आणि सुसंस्कृत होईल, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ओंकार पाठक यांनी केले. आभार घोरपडे यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.