ROP26B02610
तुंगत (ता. पंढरपूर) : येथील वनराई बंधाऱ्याची पाहणी करताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकरी संदीप कोहिनकर. यावेळी उपस्थित अमोल जाधव, डॉ. आबासाहेब रणदिवे, डॉ. अमृता रणदिवे, विद्यार्थी व ग्रामस्थ.
- -
अधिकाऱ्यांनी घेतला तुंगतच्या विकासाचा आढावा
समृद्ध पंचायतराज अभियान : विद्यार्थ्यांशी संवाद, बचत गटांना प्रोत्साहन
सकाळ वृत्तसेवा
सकाळ वृत्तसेवा
रोपळे बुद्रूक, ता. २६ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तुंगत (ता. पंढरपूर) गावातील विकासकामांचा आढावा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर व स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा पंढरपूर पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी घेतला. सरपंच डॉ. अमृता रणदिवे यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी डॉ. आबासाहेब रणदिवे, जिल्हा परिषद सदस्या गीतांजली साळुंखे, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच महिला बचत गटांच्या सदस्यांची उपस्थिती होती. अधिकाऱ्यांनी अभियानांतर्गत झालेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. या कामांची व्हिडिओग्राफी करून नोंद घेण्यात आली.
अभियानाच्या निमित्ताने गावात वृक्षारोपण, कापडी पिशव्यांचे वाटप तसेच स्वच्छता उपक्रमांतर्गत वनराई बंधारा बांधण्याचे काम करण्यात आले. अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेलाही भेट देत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना गणिताची उदाहरणे सोडवायला देऊन इंग्रजी वाचनाचा सराव करून घेतला. विद्यार्थ्यांनी अचूक उत्तरे देत आपली गुणवत्ता सिद्ध केली. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शिक्षकांचे अभिनंदन केले. त्यानंतर ग्रामपंचायतीला भेट देऊन अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच श्रेयांश बचत गटाच्या चिक्की उत्पादन व्यवसायाला भेट देऊन महिलांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे ग्रामविकासाला नवी गती मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
---
कोट
ROP26B02612
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात आमच्या गावाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळावे, यासाठी ग्रामस्थ एकजुटीने प्रयत्न करत आहेत.
- डॉ. अमृता रणदिवे, सरपंच, तुंगत (ता. पंढरपूर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.