पुणे

काशीळ जिल्ह्यात आले, हळद प्रक्रिया उद्योगाला गती द्या

CD

हळद, आले प्रक्रिया उद्योगाला गती द्या

सीमांत सैकिया; वर्णेत एकदिवसीय प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम

काशीळ, ता. ३ : जिल्ह्यात हळद व आले पिकाखालील क्षेत्र मोठे आहे. या पिकांच्या प्रक्रियेत स्वच्छता, दर्जा नियंत्रण, ट्रेसेबिलिटी आणि निर्यात मानकांचे काटेकोर पालन केल्यास शेतकरी व प्रक्रिया उद्योजकांना जागतिक बाजारपेठ काबीज करणे सहज शक्य आहे. यासाठी ‘सरस आंत्रप्रनर्स’सारख्या संस्थांनी पुढाकार घेऊन गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन स्पायसेस बोर्डाचे (मुंबई) उपसंचालक सीमांत सैकिया यांनी केले.

स्पायसेस बोर्ड (मुंबई) आणि कृषी विज्ञान केंद्र (बोरगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आले व हळद बाजारपेठ जोडणी आणि गुणवत्ता सुधारणा’ या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वर्णे (ता. सातारा) येथील ‘सरस आंत्रप्रनर्स’च्या प्रकल्पावर पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी सैकिया बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्पायसेस बोर्डाच्या सहाय्यक संचालिका डॉ. ममता धनकुटे, बोरगाव केव्हीकेचे विषय विशेषज्ञ भूषण यादगिरवार, प्रवीण मसाल्याच्या व्यवस्थापिका डॉ. पुष्पा आहेर, ज्येष्ठ दिग्दर्शक मानसिंग पवार, सरस आंत्रप्रनर्सचे कार्यकारी संचालक श्रीकांत घोरपडे व डॉ. श्रीधर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात बोलताना डॉ. ममता धनकुटे यांनी मसाले प्रक्रियेमध्ये गुणवत्ता नियंत्रणाचे महत्त्व अधोरेखित केले, तर भूषण यादगिरवार यांनी काढणीपश्चात व्यवस्थापन आणि प्रक्रिया तंत्रज्ञानाचे सविस्तर सादरीकरण केले. प्रक्रियेसाठी कच्चा माल निवडताना कोणती काळजी घ्यावी आणि उद्योगाच्या स्तरावर मानके कशी टिकवावीत, यावर डॉ. पुष्पा आहेर यांनी मार्गदर्शन केले. केवळ तांत्रिक माहिती न देता, प्रशिक्षणादरम्यान ‘सरस आंत्रप्रनर्स’ येथे श्रीकांत घोरपडे व डॉ. पवार यांनी आले आणि हळद मूल्यवर्धनाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले. प्रक्रिया उद्योगातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य कसे मिळवता येईल, यावर यावेळी विशेष चर्चा करण्यात आली.
या प्रशिक्षण शिबिरास जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी, प्रक्रिया उद्योजक आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

01653
वर्णे ः येथील सरस आंत्रप्रनर्सच्या प्रकल्पातील प्रक्रियेची माहिती देताना श्रीकांत घोरपडे, त्या वेळी शेतकरी.

Baramati Crime : बारामती तालुका पोलिसांनी प्रेमी युगुलाला लुटणा-या तिघांना काही तासात केले गजाआड....

Mathura Holika Dahan: जळत्या होळीमध्ये चालतो माणूस; मथुरेतील 'या परंपरेमागचं रहस्य काय? ४५ दिवसही करतो अन्नत्याग

ISRO मध्ये वैज्ञानिक असल्याचे सांगत लग्नाचं आमिष; पुण्यातील महिलेकडून ४२ लाख रुपये उकळले...

IND vs ENG, Semi: भारताने इंग्लंडविरुद्ध कोणती Playing XI खेळवावी? रवी शास्त्री, रिकी पाँटिंग यांचा सल्ला; म्हणाले, अभिषेकला तर...

विकी कौशल चिमुकलीच्या चक्क पडला पाया! स्टेजवरचा तो क्षण पाहून सगळेच झाले भावूक, Viral Video

SCROLL FOR NEXT