sakal
पुणे

इंदापूर बाह्यवळण मार्गावर भीषण अपघातात बारा ऊसतोड कामगार जखमी

जखमींमध्ये कामगारांच्या सात लहान मुलांचा समावेश

डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर: इंदापूर शहर बाह्यवळण महामार्ग शिंदे चौका नजिक ढगे फार्महाऊस समोर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग सर्विस रस्त्यावर आडवे आलेल्या कुत्र्यास वाचविण्याच्या प्रयत्नातऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची रिकामी ट्रॉली पलटी झाल्याने झालेल्या अपघातात बारा जण जखमी झाले. जखमीमध्ये बीड जिल्ह्यातील पाच ऊसतोड कामगार असून अपघातात कामगारांच्या सात मुलांचा समावेश आहे. हा अपघात बुधवार दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता झाला असून इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविणेप्रकिया सुरू आहे. अपघातात जखमी झालेले सर्व जण बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर आहेत . ट्रॅक्टर चालक उसाचा मोकळा ट्रॅक्टर दोन ट्रॉल्यासह घेवून पुणे बाजूने सोलापूर दिशेस चालला होता.

मात्र कुत्रे आडवे आल्याने ट्रॅक्टर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने ट्रॉली पलटी झाल्याने ट्रॉलीत बसलेले सर्व जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखलकरण्यात आले असून त्यापैकी तीन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बारामती येथील महिला रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. मयुरी विठ्ठल मोरे (वय ६), लखन गायकवाड ( वय ८ ), विवेक लखन गायकवाड ( वय ६ ), कविता गंगाराम पवार ( वय ६ ), सीमा संजय पवार ( वय १८ ), रेश्मा सुनील सपकाळ (वय ३०), अनिकेत पांडुरंग गायकवाड ( वय १० ),आरती लखन गायकवाड ( वय १२), जोष्णा विठ्ठल माटे ( वय २६ ),जनाबाई लखन गायकवाड ( वय २६ ),आशा गंगाराम पवार ( वय ६०,सर्व रा. बीड जिल्हा) ही अपघातातील जखमींची नावे असून ट्रॅक्टर चालक परांडा येथील असून अद्याप त्याचे नाव समजले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, तरीही संघात एक बदल! भारताच्या Playing XI मध्ये कोणाची एन्ट्री?

AI Powered Cancer Diagnosis: तंबाखू, प्रदूषण की केमिकल? DNA पाहून कॅन्सरचं ‘खरं कारण’ शोधणार आता AI!

Hadapsar News : थायलंडमधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस अभिजीत आर्ट्सचे डायमंड वर्क

Pune Rain Update : पुढील दोन दिवस शहरात पावसाची उघडीप

पाकिस्तानने मदत नाकारली! सौदीने थेट इस्रायलकडे मागितला गुप्तचर यंत्रणेचा सपोर्ट; हुती बंडखोरांचा उद्रेक

SCROLL FOR NEXT