corona Sakal Media
पुणे

जुन्नर : लग्नसोहळ्यातील वऱ्हाडी मंडळीच निघाली कोरोना पॉझिटिव्ह

तेवीस जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह

दत्ता म्हसकर ः सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : धोंडकरवाडी-निमदरी (ता. जुन्नर) येथील एका लग्न सोहळ्यास उपस्थित वऱ्हाडी मंडळी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील लग्नसोहळा हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे. धोंडकरवाडी येथे नुकताच पार पडलेल्या घरगुती लग्नसोहळ्यात ही घटना घडली.

नवरदेव तसेच घरातील नातेवाईक वऱ्हाडी मंडळींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यास येणेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील दुजोरा दिला आहे. कोरोना संशयित असलेली या घरातील वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. लॉकडाऊनमध्ये लग्न सोहळ्याला आवश्यक असणारी परवानगी घेतली असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. हा विवाह सोहळा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घरीच संपन्न झाला.

दुसऱ्या दिवशी सत्यनारायण महापूजा देखील झाली. या निमिताने पाहुणे मंडळींची हजेरी लागली होती. लग्नानंतर दोन दिवसांनी नवरदेव मुंबईला जाऊन आला होता. त्यानंतर त्यास त्रास होऊ लागल्याने कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आल्यामुळे लग्न सोहळ्याला उपस्थित असलेल्या संपर्कातील सुमारे ४० नातेवाईकांची कोरोना चाचणी लेण्याद्री येथे करण्यात आली. यात तेरा जण पॉझिटिव्ह निघाले. तर खासगी प्रयोगशाळेच्या तपासणीत सुमारे दहा जण पॉझिटिव्ह निघाले असे एकूण तेवीस जण पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. बहुतेक रुग्णात सौम्य लक्षणे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. घरगुती पध्दतीने लग्न सोहळा झाला असला तरी मास्क व सॅनिटायझरचा वापर सामाजिक अंतर याबाबत फारशी काळजी न घेतल्याने एवढी मोठी रुग्ण संख्या वाढल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला! औंधमध्ये जोरदार सरी, शहरातील अनेक भागांत पाऊस; पुणेकरांनी तारांबळ

Pune Solapur Highway: कदमवाकवस्तीत सेवा रस्त्यालगत कचरा; अपघातांचे सत्र अन् साथीच्या आजारांचा धोका, नागरिक संतप्त

Latest Marathi News Update : नागपुरातील ८ सराफा व्यापाऱ्यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने जीवे मारण्याची धमकी; प्रत्येकी १० लाखांच्या खंडणीची मागणी, अभिनेता टायगर श्रॉफच्या उदाहरणाचा धाक

Bachchu Kadu : दिवाळी मदतीवरून बच्चू कडूंचा महायुती सरकारला घरचा आहेर, शेतकर्‍यांना 10 हजारांची मदत देण्याची मागणी

INDA vs NZA, Test: कठीण प्रसंगी जुरेल चमकला! ठोकले दमदार शतक, आकाश दीपचीही फिफ्टी; पण न्यूझीलंडच्या बॉयलकडून चोख प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT