Crime_Arrest 
पुणे

दोन लाखांच्या कर्जापोटी 14 लाखांची मागणी; पुण्यातील दोन सावकारांना अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कर्जदारास दिलेल्या दोन लाख रुपयांपोटी 14 लाखांची मागणी करीत दोन बेकायदा सावकारांनी कर्जदारास जीवे मारण्याची धमकी दिली. तेवढ्यावरच न थांबता कर्ज देताना जामीन राहणाऱ्याची दुचाकी जबरदस्तीने काढून नेल्याच्या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बेकायदा सावकारी केल्याप्रकरणी दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून सह्या घेतलेले धनादेश, कोरे मुद्रांक पेपर, वाहनांची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली. 

उमेश चंद्रकांत घारे (रा.सनसिटी, सिंहगड रस्ता), संदिप घारे (रा. वारजे माळवाडी) असे अटक केलेल्या बेकायदा सावकारांची नावे आहेत. याप्रकरणी कर्ज घेतलेल्या नागरीकाने गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे (एक) तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीस 2019 मध्ये दोन लाख रुपयांची गरज होती. त्यामुळे त्यांनी खासगी सावकार उमेश घारे आणि संदीप घारे या दोघांकडे पैशांची मागणी केली होती. त्यावेळी उमेश घारे याने फिर्यादीकडून कोरे धनादेश घेऊन चारचाकी वाहन गहाण ठेवल्यानंतर 10 टक्के व्याजदराने फिर्यादीस दोन लाख रुपये दिले. दरम्यान, फिर्यादीस मुद्दल आणि व्याजाची रक्कम देण्यास उशीर झाला. त्यामुळे आरोपींनी फिर्यादीकडे दोन लाख रुपयांची मुद्दल, 24 महिन्यांचे व्याज आणि दंड अशा एकूण 14 लाख रुपयांच्या रकमेची मागणी करीत होते. त्यासाठी फिर्यादीच्या घरी जाऊन त्यांना, त्यांच्या नातेवाईकांना अश्‍लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यास सुरूवात केली. त्याचबरोबर आरोपींनी फिर्यादीच्या घरातील साहित्याचीही मोडतोड केली. दरम्यान, फिर्यादीचा एक मित्र या प्रकरणामध्ये जामीन राहीला होता. आरोपीने त्याचीही दुचाकी जबरदस्तीने नेली. 

दरम्यान, याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाकडे फिर्याद दाखल झाल्यानंतर पथकाने त्याची पडताळणी केली. त्यानंतर बुधवारी दोघांना अटक केली. त्यांची अधिक चौकशी केल्यानंतर संबंधीत आरोपी हे बेकायदेशीरीत्या खासगी सावकारी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांच्या घरी छापा घालून सह्या घेतलेले आणि रक्कमेचा उल्लेख न केलेले धनादेश, कोरे मुद्रांक पेपर, वाहनांची कागदपत्रे, आधार कार्डच्या छायांकित प्रती पोलिसांनी जप्त केल्या. सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

आरोपींबाबत तक्रारी असल्यास पोलिसांशी संपर्क साधा 
उमेश घारे आणि संदीप घारे हे दोघेही बेकायदेशीर खासगी सावकारी करीत होते. त्यांनी अनेकांना अवैधरीत्या कर्ज देऊन त्यांच्या वसुलीसाठी नागरीकांना त्रास दिला असण्याची शक्‍यता आहे, त्यामुळे त्यांच्याविषयी कोणाची तक्रार असल्यास नागरीकांनी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथकाकडे (एक) संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT