Two and half lakh Online fraud in three cases at pune 
पुणे

पुण्यात ऑनलाईन फसवणूकीचे सत्र सुरूच; तिघांना घातला अडीच लाखांना गंडा 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : काही नागरिकांना लकी ड्रॉ लागल्याचे सांगत, तर काहींना ई-वॉलेटद्वारे पैसे परत करण्याच्या बहाण्याने, तर एका व्यक्तीस साडी खरेदी करण्याचा बहाणा करुन नागरिकांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांसह तिघांची तब्बल अडीच लाख रुपये सायबर गुन्हेगारांनी लंपास केले. 

कोंढव्यातील मीठानगर परिसरामध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय तरुणाने कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तींनी संपर्क साधला. त्यानंतर त्यांना आम्ही फ्लिपकार्डमधून बोलत असून तुम्हाला सफारी गाडी व साडेबारा लाख रुपयांचा लकी ड्रॉ लागल्याचे सांगितले. गाडी व साडे बारा लाख रुपये मिळविण्यासाठी अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर तब्बल एक लाख 53 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनीही त्यांच्या खात्यामध्ये पैसे भरले. त्यानंतर गाडी व पैसे मिळण्यासाठी अनोळखी व्यक्तींना संपर्क साधला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. 

दुसऱ्या घटनेमध्ये वानवडी पोलिस ठाण्यामध्ये हांडेवाडी येथे राहणाऱ्या 44 वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी यांच्या टिव्हीचे रिचार्ज पॅक संपले होते. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांच्या मोबाईलवरील फोन पे या ऍपद्वारे टिव्हीचे पाचशे रुपयांचे रिचार्ज केले. बराच वेळ होऊनही टिव्ही सुरू झाला नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी इंटरनेटद्वारे संबंधीत कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून पाचशे रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्यांना तेथून एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने फिर्यादी यांच्या बँकेसंबंधीची गोपनीय माहिती फिर्यादी यांच्याकडून काढून घेतली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातील 82 हजार 300 रुपये काढून घेतले. अनोळखी व्यक्तींनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

तिसऱ्या घटनेत बिबवेवाडी येथे राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना ऑनलाईन साडी खरेदी करायची होती. त्यावेळी हॅन्डलुम नावाचे वेबपेज त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी तेथे काही साड्यांची पाहणी केली. त्यानंतर त्यांना आवडलेल्या साड्यांसाठी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने 9 हजार 600 रुपये दिले. त्यानंतर त्यांनी अनेक दिवस वाट पाहूनही साड्या घरी आल्या नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT