crime 
पुणे

रयत संस्थेत कामाला लावतो सांगून उकळले लाखो रुपये

कल्याण पाचांगणे

माळेगाव (पुणे) : रयत शिक्षण संस्था, विक्रीकर भवन (नाशिक), निवासी आश्रम शाळा बचेरी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशा संस्थांमध्ये शिक्षक, क्लार्क पदावर नोकरी लावून देतो, असे आमीष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण बारामती तालुक्यात उघड झाले आहे. 

नितीन तानाजी जाधव (रा. कल्पनानगर-बारामती), गणेश कमलाकर गोडसे (रा. विद्यानगर, ता. कराड, जि. सातारा) यांनी दिलीप जगन्नाथ कीर्तने (रा. ता. माण, जि. सातारा) यांच्याकडून शिक्षक भरतीपोटी १४ लाख रुपये घेऊन फसवणूक केली आहे. निवासी आश्रम शाळा बचेरी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे शिक्षक भरतीपोटी १४ लाख रुपये आरोपींनी घेऊन कीर्तने यांची फसवणूक केली आहे. कऱ्हावागज (ता. बारामती) येथे १ जून २०१४ ते २६ जून २०२० पर्यंत टप्पा पद्धतीने वरील रक्कम आरोपींनी घेतल्याचे कीर्तने यांनी फिर्यादित नमूद केले आहे. 

तशाच प्रकारे अनिल रामचंद्र शिंदे (वय ३१, रा. वडकी नाला, वडकी, ता. हवेली) यांच्याकडून रयत शिक्षण संस्थेत क्लार्क पदावर नोकरी मिळवून देतो, असे सांगून बाबर (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याने ३ लाख ७० हजार रुपये घेतले. तसेच, शिंदे यांना बनावट नियुक्तीपत्रही त्याने दिले. १ जुन २०१३ ते २६ जून २०२० या कालावधीत बारामती एमआयडीसीमधील विवेक इंटरप्राईजेस सूर्यनगरी- बारामती येथे फसवणुकीचा प्रकार घडला. या प्रकरणी शिंदे यांच्या फिर्य़ादीच्या आधारे पोलिसानी बाबर (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्याविरुद्धही विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस अधिकारी विधाते, फौजदार लंगोटे पुढील तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

SCROLL FOR NEXT