Two arrested for demanding bribe for Talathi crime pune police sakal
पुणे

Crime News : तलाठ्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी दोघांना अटक

पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या जागेची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी वाघोली तलाठी कार्यालयात अर्ज

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वाघोली येथील तलाठ्याच्या नावे ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी दोघा मदतनीसांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भाऊसाहेब भिकाजी गिरी (वय ५६, रा. आव्हाळवाडी, वाघोली, जि. पुणे) आणि संजय मारूती लाड (वय ५३, रा. साईनगर, लोहगाव, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या जागेची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी वाघोली तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. त्यावर मदतनीस भाऊसाहेब गिरी आणि संजय लगड यांनी तलाठी पटांगे यांच्याकडून काम करून देण्यासाठी ५० हजार रूपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती.

या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपींनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे- खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT