Crime esakal
पुणे

Pune Crime : पत्रकारावर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक, चार अल्पवयीन ताब्यात

पुणे शहरातील एका दैनिकाच्या उपनगर वार्ताहरावर गोळीबार केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील एका दैनिकाच्या उपनगर वार्ताहरावर गोळीबार केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर, अन्य चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. आर्थिक व्यवहारातून आरोपींनी सुपारी घेऊन हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्रथमेश ऊर्फ शंभु धनंजय तोंडे (वय २०, रा. राजेंद्रनगर, दत्तवाडी) आणि अभिषेक शिवाजी रोकडे (वय २२, रा. नांदेड गाव) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, तीन कोयते, चार दुचाकी, तीन मोबाईल जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी २७ मे रोजी रात्री दुचाकीवर घरी जात होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या पाचजणांनी फिर्यादीवर मिरची पावडर टाकून कोयत्याने मारण्याची धमकी दिली. यानंतर ११ जून रोजी रात्री महर्षीनगर परिसरात आरोपींनी फिर्यादीच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडली. परंतु गोळी डोक्याच्या बाजूने गेली. याबाबत स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान या गुन्ह्यातील दोघेजण पेरणेफाटा, लोणीकंद परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावर पोलिसांनी दोघांना अटक केली. तर, साथीदारांना धायरी, नांदेड गावातून ताब्यात घेतले.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक अशोक इंदलकर, वरिष्ठ निरीक्षक सुनील झावरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT