Two arrested for selling fake seeds Fraud with farmers pune  sakal
पुणे

बनावट बियाणाच्या विक्री प्रकरणी दोन जणांना अटक

जागृत शेतकऱ्यामुळे प्रकार उघड

रवींद्र पाटे

नारायणगाव : पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील जागृत शेतकऱ्यामुळे सोयाबीन व कांदा या पिकांच्या बनावट बियाणाची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे.आरोपीकडून सोयाबीन व कांदा बियांणाच्या २६ पिशव्या व जीप जप्त करण्यात आली आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. या प्रकरणी रामेश्वर मनोहर देशमुख (राहणार तळणी,तालुका मंठा , जि. जालना), लोकेश शंकर डुंबरे ( राहणार राजुरी, तालुका जुन्नर , जि.पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

दत्तात्रय तुकाराम वऱ्हाडी( राहणार पिंपळगाव तर्फे नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी ६ जुलै २०२२ रोजी आरोपी कडून वीस किलोग्रॅम वजनाची सोयाबीन बियाणाची पिशवी खरेदी केली. पेरणी करण्यापूर्वी वऱ्हाडी यांनी बियाणाच्या पिशवीवरील मजकुराचे वाचन केले असता बियाणाच्या पिशवीवर बियाणांची उगवनक्षमता,शुद्धता, परीक्षण दिनांक , टॅगनंबर , शिफारस हंगाम व बियाणे सत्यता दर्शक लेबल आदी माहीती आढळुन आली नाही.संशय आल्याने वऱ्हाडी यांनी या बाबतची माहिती आमदार अतुल बेनके, पंचायत समिती जुन्नरचे कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक नीलेश प्रकाश बुधवंत यांना दिली.त्या नंतर तालुका कृषी अधिकारी सतिश शिरसाठ, बियाणे निरीक्षक बुधवंत व वऱ्हाडी यांनी येथील निलायम हॉटेल जवळ बियाणे विक्रीसाठी आलेले रामेश्वर देशमुख , लोकेश डुंबरे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ असलेल्या गाडीत सोयाबीन बियांणाच्या प्रत्येकी वीस किलोग्रॅम वजनाच्या पाच पिशव्या, कांदा बियांणाच्या २० पिशव्या आढळून आल्या. आरोपीकडे बियाणे विक्रीचा परवाना, उगम प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आढळून आली नाही.

या मुळे बियाणे निरीक्षक बुधवंत यांनी या बाबतची तक्रार नारायणगाव पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी बनावट बियाणाची विक्री प्रकरणी रामेश्वर देशमुख , लोकेश डुंबरे यांना अटक करून त्यांच्या ताब्यातील सोयाबीन व कांदा पिकांचे बनावट बियाणे व जीप असा मुद्देमाल जप्त केला.

अतुल बेनके (आमदार , जुन्नर): ज्या शेतकऱ्यांनी रामेश्वर देशमुख , लोकेश डुंबरे यांच्याकडून सोयाबीन व कांदा बियांणाची खरेदी केली आहे. आशा शेतकऱ्यांनी या बाबतची तक्रार नारायणगाव पोलीस ठाण्यात करावी. बियाणे खरेदी करताना विक्रेत्याकडून पक्की पावती घ्यावी.कृषी विभागाने सतर्क राहून बनावट बियाणे विक्री करणाऱ्यांचा शोध घ्यावा. या कामात हलगर्जी करणाऱ्या संबंधित कृषी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News:बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी : नाईक

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT