3arrested_54.jpg
3arrested_54.jpg 
पुणे

पुण्यात गांजा विकणाऱ्या दोघांना अटक; दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरामध्ये गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने (पुर्व) अटक केली. त्यांच्याकडुन दोन लाख रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.

संदीप भागवत वाघ (रा. उपळाई ठोगे,बार्शी, सोलापूर), अभिजीत भगवान थिटे (रा.वैभव टाॅकीजसमोर,गरड बिल्डींग, हडपसर मुळ रा.बार्शी, सोलापूर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक विजय टेकाले यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाकडुन हडपसर परिसरामध्ये गस्त घालण्याचे काम सुरु होते. त्यावेळी हडपसर भागातीळ यश बिर्याणीसमोरील ट्रँगल ब्रिज येथे दोन व्यक्ती संशयासदरित्या थांबले असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली. तेव्हा त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांच्याकडील सॅकची तपासणी केली. त्यावेळी सॅकमध्ये सात किलो 935 ग्रॅम  गांजा, एक दुचाकी, 1200 रूप यांची रोख रक्कम रुपये असा एकूण दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तसेच त्यांना अटक करून हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT