leopard Attack
leopard Attack sakal
पुणे

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात दोन दुचाकीस्वार जखमी

रवींद्र पाटे

नारायणगाव - येथील शेटे मळा शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन दुचाकीस्वार जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी येथील शेतकरी विकास तोडकरी, योगेश तोडकरी, धनंजय तोडकरी, संदीप पाटे, रोहन पाटे यांनी केली आहे.

बिबट्याच्या हल्ल्याची नारायणगाव परिसरातील मागील महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने व ऊस तोडणी सुरू झाल्याने बिबटे सैरभैर झाले आहेत. पाळीव जनावरांबरोबरच मानवावर बिबट्या हल्ले करू लागल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात प्रगतशील शेतकरी बाळासाहेब तोडकरी (वय-65) व भंगार व्यावसायिक शर्मा (वय-35) हे जखमी झाले आहेत.

रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बाळासाहेब तोडकरी हे मोटर सायकल वरून नारायणवाडी रस्त्याने घरी चालले होते. शेटे मळा जवळील ओढ्या जवळ आले असता रस्त्याच्या कडेच्या उसात असलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात त्यांच्या पायाला गंभीर जखम झाली. स्थानिक नागरिकांनी त्यांना नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

त्यानंतर साडेआठच्या सुमारास याच रस्त्याने भंगार व्यावसायिक शर्मा हे मोटरसायकलवर जात असताना त्याच बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या पायाला व हाताला जखम झाली आहे. त्यांच्यावर सुद्धा नारायणगाव ग्रामीण पुण्यात उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती समजताच घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, वनपाल अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, आपदा मित्र सुशांत भुजबळ यांनी भेट दिली.

16 जानेवारी रोजी वारुळवाडी येथील सुनीता मेहेश बनकर यांच्यावर बिबट्याने तीन वेळा हल्ला केला होता. पाणी भरण्याच्या खोऱ्याने प्रतिकार केल्यामुळे या महिलेला जीवदान मिळाले होते. नारायणगाव परिसरामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतकऱ्यांचा जीव धोक्यात असताना वनविभागाच्या वतीने कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

वनरक्षक ज्ञानेश्वर पवार -

शेटे मळा परिसरात दोन बछड्यासह बिबट्याचे वास्तव्य आहे. बछडे सोबत असताना मादी आक्रमक बनते. बछड्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव ती मानवावर हल्ला करते. शेटे मळा येथे झालेली घटना याच प्रकारची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT